मुंबई : राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. निकालानंतर बँकिंग क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची करियर निवडीसाठी आणि त्या अनुषंगानं कॉलेज किंवा शैक्षणिक संस्थेत अॅडमिशन्ससाठी धडपड सुरु झाली आहे. अशाच धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बँकिंग क्षेत्रातील संधी काय आहेत? हे आम्ही सांगणार आहोत. (Want to pursue a career in banking after 12th standard Find out what are the career options)
एकतर बँकिंग हे एक असं क्षेत्र आहे, ज्यामध्ये कधीच रोजगाराच्या संधी समाप्त होत नाहीत. त्यामुळं इथं कायमचं नव्या लोकांची गरज भासते. या क्षेत्राचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला आर्थिकबाबींमध्ये चांगली जागरुकता निर्माण होते. तसेच चांगल्या प्रकारे पगाराच्या संधीही इथं उपलब्ध होतात. एकूणच स्थिर, चांगल्या पगाराची आणि ज्ञानात भर घालणारं क्षेत्र म्हणून बँकिंग करियरकडे पाहता येईल.
पूर्वी बँकिंगचा संबंध हा केवळ बँकेतील खात्यात पैसे भरणे आणि पैसे काढणे इथंपर्यंत मर्यादित राहिलेलं नाही. ऑनलाईन बँकिंग आणि गरजा वाढल्यानं कर्ज घेण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्याअनुषंगानं बँकेच्या विविध विभागांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांची गरज भासते आहे. उदा. अकाऊंटिंग, बँकिंग अॅडमिनिस्ट्रेशन, कन्झूमर बँकिंग, कमर्शिअल बँकिंग, ह्युमन रिसोर्स या विभागांमध्ये संधी आहेत. त्याशिवाय कम्प्लायन्स, ऑपरेशन्स, टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन सिस्टिम, सिक्युरिटी, मार्केटिंग, पब्लिक रिलेशन्स, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि इतरही अनेक विभागांत बँकिंग क्षेत्रात कामं मिळू शकतात.
बँकिंग करिअरसाठी काय आहे पात्रता?
बँकिंग क्षेत्रात करिअरसाठी सर्वसाधारणपणे कॉमर्समधून शिक्षण झालेलं असणं गरजेचं आहे. या शिक्षणामध्ये बेसिक बँकिंगचाही अंतर्भाव असल्यानं अशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेणं जास्त सोयीच जात. पण जरी कॉमर्समधून शिक्षण झालेलं नसलं तरी एखादा बँकिंगचा बेसिक कोर्स करुनही पुढे संधी मिळू शकतात. बारावीनंतर बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे योग्य कोर्सेस निवडणं गरजेचं आहे. बारावीनंतर पदवी आणि पदव्युत्तर पदवी करणं गरजेचं आहे.
पदवी पातळीवरील डिग्री कोर्सेस
BBA in Banking/Accounting
Bachelor’s in Banking and Finance
Bachelor’s in Finance and Accounting
BFM (Bachelor’s in Financial Mathematics)
Bachelor’s in Statistics and Business
Bachelor’s in Analytical Finance
पदव्युत्तर पदवीसाठीचे कोर्सेस
MFM (Master’s in Financial Mathematics)
Master’s in Banking and Finance
MEMF (Master’s in Monetary and Financial Economics)
MFA (Master’s in Finance/ Accounting)
बारावीनंतरचे डिप्लोमा कोर्सेस
Banking and Financial Services
Banking Management
Retail Banking
PGDM in Banking Operations
PGDM in Banking
विविध प्रकारच्या बँकिंग परीक्षा
स्पेशालिस्ट ऑफिसर
प्रोबेशनरी ऑफिसर
रिजनल रुरल बँक एक्झाम
क्लर्क
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.