MPSC New Exam Pattern sakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC New Syllabus : असा असणार MPSC चा नवा पॅटर्न ! २०२५ साली होणार लागू

MPSC च्या अभ्यासक्रमात कोणते मोठे बदल करण्यात आलेत? वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

MPSC New Syllabus News : MPSC च्या अभ्यासक्रमात 2023 पासून बदल करण्याचा निर्णयाविरोधात राज्यभर MPSCच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यास सुरवात केली होती. अखेर त्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहेत. अखेर आयोगाने मोठा निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय.

नवा अभ्यासक्रमातील बदल आता 2023 पासून नाही तर 2025 पासून लागू होतील अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करुन दिली. पण तुम्हाला माहिती आहे का MPSC च्या अभ्यासक्रमात कोणते मोठे बदल करण्यात आलेत? आणि कसा असणार असणार MPSCचा नवा पॅटर्न? आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

MPSC च्या अभ्यासक्रमात कोणते मोठे बदल करण्यात आले आहेत?

  • आता MPSCची परीक्षा ही वर्णनात्मक असेल आणि यात एकूण 9 पेपर असतील.

  • त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे पेपर प्रत्येकी 300 गुणांचे असतील तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील.

  • याशिवाय मुलाखतीसाठी 275गुण असतील. त्यामुळे एकूण गुण 2 हजार 25 असतील.

  • सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.

  • सोबतच एकूण 24 विषयांतून उमेदवारांना 1 वैकल्पिक विषय निवडता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Passenger bus caught fire : भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस पेटली; लहान मुलं, महिलांसह १५ जणांचा मृत्यू

Thane News: परप्रांतीयांची मुजोरी वाढली! दिवाळीचा स्टॉल लावण्यावरून वाद पेटला, अमराठी महिलांचं मराठी महिलांसोबत नको ते कृत्य

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीग्रस्तांसाठी पुणे जिल्हा बँकेकडून १.२६ कोटींची मदत

Medical Admission Scam : वैद्यकीय प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांना सीईटी सेलची नोटीस

Ex-Army Man Own Funeral : ऐकावं ते नवलंच! बाबानं जिवंतपणीच काढली स्वत:ची अंतयात्रा अन् मग स्मशानात पोहचताच...

SCROLL FOR NEXT