Exam Tips
Exam Tips  esakal
एज्युकेशन जॉब्स

Exam Tips : मुलांना परीक्षेचा ताण येतोय? या ५ योगासनांनी वाढेल एकाग्रता

सकाळ डिजिटल टीम

Yoga For Concentration And Stress Relief : सध्या शालेय, महाविद्यालयीन परीक्षांचा काळ आहे. त्यामुळे फक्त मुलच नाही तर त्यांचे पालकही परीक्षांचं फार टेन्शन घेतात. बऱ्याच मुलांची आणि पालकांची तक्रार असते की, अभ्यास तर करतो पण ऐन वेळी काही आठवत नाही. टेन्शन येतं. बरेच प्रयत्न करूनही लक्ष केंद्रित करू शकत नाही. अशा मुलांसाठी काही योगासनांच्या टिप्स आहेत ज्यामुळे मनातली एकाग्रता वाढून ताण कमी होतो.

ताडासन

ताडासन मुलांसाठी फार फायदेशीर असते. यामुळे मुलांचा पोश्चर सुधारतो. उंची वाढते. शिवाय मुलांचं मानसिक आरोग्यही नीट राहण्यास मदत होते.

भुजंगासन

या आसनामुळे मुलांमध्ये समन्वय सुधारतो. शरीर लवचिक होतो. भुजंगासनाने मन एकाग्र व्हायला आणि बुद्धी तल्लख होण्यासाठी मदत मिळते. रोज सराव करायला हवा.

पर्वतासन

परीक्षेचा वेळ येताच मुलांची बाहेरची काम पूर्ण थांबतात. अशा स्थितीत शारीरिक हालचाल कमी होते. त्यामुळे शरीर आणि मन चांगले कार्य करण्यासाठी आणि तणावग्रस्त होऊ नये म्हणून योग आवश्यक आहे. पर्वतासनाने शरीर संतुलीत आणि योग्य प्रयत्न करण्यास मदत मिळते.

पद्मासन

पद्मासनाचा सराव केल्याने मन एकाग्र राहण्यास मदत मिळते. परीक्षेत मुलं सतत एका जागी बसून अभ्यास करतात. त्यांना पाठ दुखीची तक्रार असते. अशावेळी पद्मासन केल्याने मुलांना पाठदुखीपासून आराम मिळेल, मन एकाग्र होईल.

पादहस्तासन

ज्या मुलांना जास्त ताण आणि अभ्यासाची चिंता असते आणि डोकेदुखी असते त्यांनी पादहस्तासन हे आसन करावे. त्यामुळे मन शांत राहण्यास मदत मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT