digvijay singh big claim on madhya pradesh election 2023 congress mp exit poll results  
Election News

MP Election Result : काँग्रेसचं मध्य प्रदेशात काय होणार? दिग्विजय सिंह यांनी सांगितला त्यांचा एक्झिट पोल

रोहित कणसे

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोल गुरुवारी समोर आले आहेत. एक्झिट पोल्समध्ये राज्यात भाजपचे सरकार येणार असे दिसून येत आहे. यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी एक्झिट पोल्सचा दावा नाकारला आहे. इतकेच नाही तर सिंह यांनी राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा देखील केला आहे.

एक्झिट पोलच्या निकालांबद्दल बोलतान सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, एक्झिट पोल्सबद्दल फार काही सांगितले जाऊ शकत नाही ते वेगवेगळे आकडे दाखवत आहेत.

एक्झिट पोलचे निकाल खूप वेगवेगळे आहेत. आम्ही याबद्दल काहीही सांगू शकत नाही. मी तुम्हाला खात्री देतो की मध्य प्रदेशात काँग्रेसला १३० पेक्षा जास्त जागा आणि स्पष्ट बहुमत मिळेल, असे दिग्विजय सिंह म्हणाले.

मध्य प्रदेशातील लोकांना बदल हवा आहे, त्यासाठी काँग्रेसला मते मिळतील. राज्यातील जनता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली आहे. शिवराजसिंह चौहान आणि त्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता कंटाळली आहे.

यापूर्वी गुरुवारी अनेक एजन्सींनी त्यांचे एक्झिट पोल जारी केले, ज्यामध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसून आले, तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याशिवाय, मिझोराममध्ये पुन्हा एकदा सत्ताधारी एमएनएफ सत्तेवर येण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात गुरुवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये काहींमध्ये भाजप आणि काहीमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करताना दिसत आहेत, मात्र राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार हे चित्र ३ डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे.

तेलंगणात (३० नोव्हेंबर) मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. त्याचवेळी, मतदानानुसार, छत्तीसगड तसेच राजस्थानमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम ठेवू शकते आणि तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसला बाहेरचा रस्ता दाखवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT