municipal elections exit poll 2026
esakal
mahanagar palika election exit poll : राज्यभरातील २९ महापालिकांसाठी आज(१५ जानेवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या(१६ जानेवारी) सर्व महापालिकांचा निकाल लागणार आहे. तर आज सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली होती आणि सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. मात्र मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्रात अनेक मतदार मतदानासाठी रांगेत दिसून आले. दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी करायला सुरू केली होती.
दरम्यान, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ‘साम’ मराठीचा या निवडणुकीच्या संभाव्य निकालासंदर्भातील एक्झिट पोल जाहीर झाला. यानुसार मुंबईत भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. मुंबईत महायुतीला ११९, ठाकरे बंधूंना ७५ आणि काँग्रेस आघाडीला २५ जागा मिळताना दिसत आहे. तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत असून ८४ जागा, शिवेसेनेला ३५, ठाकरे- ६५, काँग्रेस-२३ मनसे १० राष्ट्रवादी – ०३ अन्य ०३, वंचित -०२
याशिवाय मतदानाच्या दिवशी राज्यभरातील अनेक मतदान केंद्रांवर गोंधळही पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी बोगस मतदार आढळले, काही ठिकाणी मतदारांची नावेच गायब झाली होती, तर काही ठिकाणी विरोधी गटांमध्ये हाणामारीच्याही घटना घडल्या. तसेच, मतदान करण्याआधी बोटाला लावली जाणारी शाई देखील पुसली जात असल्याने, विरोधी पक्षांनी यावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. एकूणच दिवसभरात वातावरण गोंधळाचच राहिली.
दरम्यान सामच्या एक्झिट पोलनुसार पनवेलमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरत आहे, या ठिकाणी भाजपला ४७ जागा मिळत आहेत. तर ठाण्यात शिवसेनेने गड राखला असून या ठिकाणी ७२ जागा शिवसेनेला मिळत आहेत. तर भिवंडीत त्रिशंकु अवस्था आहे. य ठिकाणी काँग्रेस २५ भाजप २१ केडीएमसी मध्ये शिवसेनेला ५७ जागा मिळताना दिसत आहेत. मीरा भाईंदरमध्येही भाजपला यश मिळत असून या ठिकाणी ४४ जागा मिळत आहेत. तर शिवसेनाला या ठिकाणी ३९ जागा मिळणार आहेत. वसई विरारमध्ये बविआ ७२ जागांसह सत्तेत दिसत आहे, तर उल्हासनगरमध्ये शिवसेनेला २९ आणि भाजपला २८ जागा.
तर पुण्यात भाजपला ७० जागा मिळताना दिसत असून भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. खरंतर या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. याचबरोबर पुण्यात शिवसेनेला १२ जागा मिळताना दिसत आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्येही भाजप सत्तेत दिसत असून या ठिकाणी देखील भाजपला ७० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४२ जागा मिळताना दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.