Manipur Election Result News 
Election News

मणिपूरमध्ये भाजपची दणदणीत आघाडी, काँग्रेसची धाकधूक वाढली

२०१७ प्रमाणे यावेळी सुद्धा काँग्रेस सत्ता मिळवण्यास अपयशी ठरणार, असे चिन्ह आहे.

सकाळ डिजिटल टीम

मणिपूर राज्यात भाजप आघाडीवर असुन आता काँग्रेसचीही धाकधूक वाढली आहे. २०१७ प्रमाणे यावेळी सुद्धा काँग्रेस सत्ता मिळवण्यास अपयशी ठरणार, असे चिन्ह आहे. येत्या काही तासात निकाल हाती येणार आहेत तरीसुध्दा निकालांचीही उत्कंठा वाढत आहे. (Manipur Assembly Election Result Live)

कोणते पक्ष निवडणूक लढवत आहेत?

भाजप राज्यात सर्व 60 जागांवर निवडणूक लढवत आहे. सध्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे हिंगांग मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस 54 जागी निवडणूक लढवतंय. तर, नॅशनल पीपल्स पार्टी 42 जागांवर, जनता दल (युनायटेड) 38 जागी, नागा पीपल्स फ्रंट 10 विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहे.

2017 निवडणुकीत काय झालं होतं?

2017 च्या निवडणुकीत काँग्रेसनं 28 जागा जिंकल्या, तर भाजपला मणिपूरमध्ये 21 जागांवर विजय मिळाला तरीसुध्दा सर्वाधिक जागा जिंकुन काँग्रेस इथे सत्ता स्थापन करु शकला नाही. भाजपनं नॅशनल पीपल्स पार्टी, नागा पीपल्स फ्रंट आणि लोक जनशक्ती पार्टी सोबत आघाडी केली आणि सत्ता हाती घेतली. एन. बिरेन सिंह यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपनं 2017 मध्ये पहिल्यांदाच मणिपूरमध्ये सरकार स्थापन केलं. त्या आधी 15 वर्षं मणिपूरमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. आता या वेळेसही असे झाले तर काँग्रेस पुन्हा सत्ता गमावू शकते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळा खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

Latest Marathi News Live Update : शरद पवार आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर, काय आहे कारण?

'हा कसला फालतूचा अ‍ॅटिट्यूड' काजोल पापाराझींवर भडकल्याने नेटकरी संतापले, Viral Video

Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

SCROLL FOR NEXT