Election News

Madhya Pradesh Election Results : मुख्यमंत्री पदाबाबत शिवराजसिंहांची स्पष्ट भूमिका; म्हणाले...

संतोष कानडे

भोपाळः मध्य प्रदेशात भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर विद्यमान विधानसभेचे मावळते मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांनी एक मुलाखत दिली. ते म्हणाले की, मी निकालांच्या बाबतीत निश्चिंत होतो. मध्य प्रदेशात मोदींची जादू चालली आहे. भाजपला जनतेचा आशीर्वाद मिळाला असून आम्ही स्वतःला नशीबवान समजतो की, मोदींच्या काळात आमचा जन्म झाला.

शिवराजसिंह पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये गौरवशाली भारताचं निर्माण होत आहे. पंतप्रधानांचं नाव आणि त्यांच्या सभांचा प्रभाव राज्यामध्ये बघायला मिळला. शिवाय राज्यात लोककल्याणकारी योजना राबवल्याने लोकांमध्ये समाधान दिसून आलं.

मुख्यमंत्री पदाबद्दल बोलताना शिवराजसिंह म्हणाले, आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशाने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. आम्ही असा विचार करत नाहीत की, आम्हाला काय पाहिजे.. आम्ही कुठं काम केलं पाहिजे, हे पक्ष ठरवत असतो.

मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार?

‘लाडली बहना’ योजनेमुळे विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण भाव खाऊन जात असले तरी त्यांच्याविषयी जशी राज्यात नाराजी आहे, तशीच भाजपांतर्गतही आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा दावेदार कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह ७ खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यापैकी निवास मतदारसंघातील उमेदवार व मंत्री फग्गनसिंह कुलस्ते हे काँग्रेसकडून पराभूत झाले. त्यामुळे नरेंद्र सिंह तोमर, कैलास विजयवर्गीय, विश्वास सारंग ही नावे चर्चेत असली तरी ऐनवेळी ज्योतिरादित्य शिंदे यांचेही नाव समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘लाडली बहना’ योजना आहे तरी काय?

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये सुमारे २ कोटी ९० लाख पुरुष मतदार आहेत, तर २ कोटी ८० लाख महिला मतदार आहेत. हीच बाब हेरून भाजपने ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडली बहना ही योजना अमलात आणून महिलांच्या बँक खात्यावर १५०० रुपये जमा केले. त्याचवेळी भाजपने प्रचारादरम्यान सत्तेत काँग्रेस सरकार आल्यास ही योजना बंद करणार, असाही प्रचार केला होता. परिणामी, महिला मतदार यावेळी भाजपसाठी महत्त्वाचा ‘फॅक्टर’ राहिल्याचे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT