uttarakhand assembly election 2022
uttarakhand assembly election 2022 e sakal
Assembly Election

प्रत्येकवेळी आमदार बदलणारे चार मतदारसंघ, यंदा भाजप-काँग्रेस बदलणार इतिहास?

सकाळ डिजिटल टीम

उत्तराखंड विधानसभेचे निवडणूक (Uttarakhand Assembly Election 2022) काही दिवसांतच होणार आहे. त्यानुसार राज्यात प्रचाराचा धुरळा देखील सुरू झाला आहे. या राज्यात भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याने दिग्गजांना राजकीय फेरबदलांची भीती निर्माण झाली आहे. राज्यात असे काही विधानसभा मतदारसंघ (Assembly Constituency) आहेत, जिथं जनतेनं प्रत्येकवेळी आमदार बदलला आहे. सलग दोनदा आमदार होण्याची संधी कुठल्याही नेत्याला दिली नाही. या मतदारसंघात नेहमीचा ट्रेंड सुरू राहील की यंदा इतिहास बदलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उत्तराखंडमध्ये एकूण चार विधानसभा मतदारसंघात जनतेने प्रत्येकवेळी आमदार बदलले आहे. सलग दोन टर्म कुठल्याच आमदाराला संधी दिली नाही. पाहुयात असे मतदारसंघ -

चंपावत मतदारसंघ :

चंपावत विधानसभा मतदारसंघाचा ८० किलोमीटरचा भाग नेपाळला लागून आहे. बनबासा येथे भारत आणि नेपाळला जोडणार एक पूल देखील आहे, जिथून दोन्ही देशातील नागरिक ये-जा करतात. पूर्णावती मातेचं धाम देखील याच मतदारसंघात आहे. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर चंपावतमध्ये २००२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली. यावेळी काँग्रेसचे हेमेश खार्कवाल आमदार होते. त्यानंतर २००७ मध्ये भाजपचे मदनसिंह महाराणा यांच्या पत्नी बीना महाराणा आणि २०१२ मध्ये पुन्हा काँग्रेसचे हेमेश खार्कवाल निवडून आलेत. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे कैलास गहातोडी निवडून आलेत. यंदा ते इतिहास बदलणार, की जनता आणखी आमदार बदलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लालकुंआ मतदारसंघ :

लालकुंआ मतदारसंघ २००८ नंतर अस्तित्वात आला. येथे २०१२ मध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या. त्यावेळी अपक्ष उमदेवार हरीशचंद दुर्गापाल विजयी झाले होते. त्यानंतर २०१७ मध्ये दुर्गापाल हे काँग्रेसकडून लढले. मात्र, भाजपच्या नवीन चंद्र दुमका यांनी त्यांना पराभूत केले.

पुरोला विधानसभा निवडणूक :

उत्तरकाशी जिल्ह्यातील पुरोला विधानसभा मतदारसंघात देखील प्रत्येकवेळी आमदार बदलले आहेत. याठिकाणी २००२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली. त्यावेळी भाजपचे मालचंद विजयी झाले होते. त्यानंतर २००७ मध्ये काँग्रेसच्या राजेश जुवाठा यांना मतदारांनी संधी दिली होती. तसेच २०१२ मध्ये भाजपच्या मालचंद यांनी विजय मिळवला होता. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राजकुमार यांनी मालचंद यांना पराभूत केले.

देवप्रयाग विधानसभा मतदारसंघ :

देवप्रायग विधानसभेतून २००२ मध्ये काँग्रेसचे प्रसाद नैथानी निवडून आले होते. २००७ मध्ये दिवाकर भट्ट, तर २०१२ मध्ये प्रसाद नैथानी हे आमदार झालेत. २०१७ मध्ये भाजपचे विनोद कंडारी यांनी अपक्ष उमेदवार दिवाकर भट्ट यांचा पराभव केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT