फॅमिली डॉक्टर

मोठी एकादशी मोठ्ठा उपवास

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

भारतीय संस्कृतीत व प्राचीन भारतवर्षात मानवाच्या कल्याणासाठी ऋषीमुनींनी जे श्रेयस कार्य करून ठेवले आहे ते संपूर्ण जगात इतरत्र कुठेही झालेले दिसत नाही. लोककल्याणासाठी, मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी, मानवाचे जीवन समृद्ध करण्यासाठी अनेक शास्त्रे विकसित केली व महत्त्वाचे म्हणजे ही सर्व शास्त्रे एकमेकाला पूरक आहेत. आरोग्य उत्तम राहण्यासाठी, आध्यामिक उन्नती व्हावी यासाठी व माणसाला हवी असलेली चिरंतन शांती मिळावी यासाठी उपवासाचे नियोजन केलेले दिसते. 

साधारणतः उपवास म्हणजे खाण्याशी संबंधित क्रिया, हे समीकरण असल्यामुळे उपवासाचा संबंध केवळ शरीराच्या आरोग्याशी आहे असा समज होतो. परंतु उपवास हा माणसे व त्यांच्या स्वतःच्यात असलेल्या अस्तित्वाशी व अंतरात्म्याशी जोडणारा एक विधी आहे. ‘उप’ म्हणजे जवळ व ‘वास’ म्हणजे राहणारा. म्हणजे आपल्या सर्वांत जवळ राहणाऱ्याशी भेट करवून देणारा तो ‘उपवास’. खरे पाहताना मनुष्य स्वतःच्या जेवढा जवळ असेल, जेवढा स्वतःशी एकरूप असेल, त्याचे बाह्य व्यक्‍तिमत्त्व त्याच्या अंतरंगाशी जेवढे समरूप व जोडलेले असेल तेवढा मनुष्य आरोग्यवान राहतो. 

प्रज्ञापराध म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्यापासून दूर नेणारे कर्म असे समजायला हरकत नाही व आयुर्वेदाने प्रज्ञापराध हेच सर्व रोगांचे कारण सांगितले आहे. 

उपवास ही एक शरीर, मन व आत्मा यांना एकत्र जोडण्यासाठी केलेली योजना आहे. म्हणजे उपवास हा सर्वांत मोठा आध्यात्मिक योग म्हणायला हरकत नाही, जो मनाला बरोबर घेऊन शरीर व आत्म्याला एकत्र जोडतो. 

भारतात चार महिने एवढ्या मोठ्या कालावधीसाठी उपवास तंत्राचे विशेष नियोजन केलेले दिसते. वर्षाऋतूत ज्या वेळी पावसाळा परम अवस्थेत असतो, म्हणजे साधारण श्रावण, भाद्रपदात होणारी वातवृद्धी सर्वांना त्रासदायक ठरू शकते. वातामुळे शरीराला अस्वस्थता येऊ शकते, रोग निर्माण होऊ शकतो वा मनाला चंचलता प्राप्त होऊ शकते. मनाच्या चंचलतेमुळे सर्व कटकट व त्रास उत्पन्न नाही झाले तरच नवल. 

म्हणून आषाढी एकादशीपासूनच पुढचे चार महिने उपवासासाठी वापरावेत असे शास्त्राने सांगून ठेवले आहे. या चार महिन्यांत एखादी विशिष्ट वस्तू सेवन न करणे, जडान्नाचे सेवन टाळणे, मांसाहार न करणे, मद्यपान न करणे, कांदा, वांगे वा तत्सम वातूळ पदार्थ न खाणे असा उपवास करता येतो. याचबरोबर सोमवार, शनिवार वगैरे आठवड्यातून एक दिवस किंवा एकादशी, प्रदोष, चतुर्थी वगैरे दिवस निवडून उपवास करता येतो. साधारणतः उपवासात तपस्या अंतर्भूत असल्यामुळे स्वतःचे आवडीचे पदार्थ न खाता साधे, पचायला सोपे असलेले अन्न खाण्याचा नेम केला जातो. या सगळ्याने मन शांत होऊन शरीरशक्‍ती, मन व आत्मा यांना एकत्र करण्यासाठी वापरता येईल अशी योजना असते. म्हणून साधारणतः एकभुक्‍त राहून उपवास केला जातो म्हणजे एक वेळ जेवण करून बाकी वेळ लंघन केले जाते; एखाद्या दिवशी नुसत्या फळांवर, दुधावर वा पाण्यावर राहणे, पचायला सोपा असा एकच कुठला तरी पदार्थ खाणे अशा अनेक प्रकारे उपवास केला जाऊ शकतो. 

युरोपीय देशात काही ठिकाणी वर्षातील चाळीस दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. येशू ख्रिस्तांना क्रुसावर चढविण्याची घटना दुःखद असल्यामुळे या दिवसापासून चाळीस दिवस उपवास केला जातो. परंतु ही दुःखद घटना असल्यामुळे आपण आनंदात राहू नये असा सीमित अर्थ घेऊन मद्य व मांसाहार टाळला जातो, असे दिसते. या वेळी बाकी सर्व गोष्टी सेवन केल्या जातात.

भारतीय परंपरेने व भारतीय शास्त्राने सुचविलेला उपवास अत्यंत वैज्ञानिक, शास्त्रशुद्ध व अलौकिक आहे असेच म्हणावे लागेल. अर्थात उपवासाचा अतिरेक करू नये. उपवास करणे हा एक निर्णय असतो. साधारणतः उपवासाच्या दिवशी परमेश्‍वराची उपासना व आत्मचिंतन अपेक्षित असते, अधिक सावधानता ठेवणे अपेक्षित असते. तेव्हा चुकून काही तरी तोंडात टाकले व उपवास मोडला असे घडू नये. प्रत्येकाने स्वतःची प्रकृती पाहून, स्वतःचे वजन पाहून, वात-पित्त-कफदोषांचा विचार करून केव्हा, कधी व कसा उपवास करायचा हे ठरविणे आवश्‍यक असते. उपवास करणे याचा अर्थ काही न खाता उलट अधिक काम करणे व असावधानतेने इकडे-तिकडे भटकणे ही गोष्ट निंद्य समजली पाहिजे. सावधानता, सजगता, आत्मचिंतन, नामजप, भक्‍ती, सेवा असे सर्व करून नंतर अन्न बनविण्यात, जेवण्यात व नंतर पचविण्यात वेळ जाऊ नये म्हणूनही उपवासाच्या दिवशी खाण्या-पिण्यावर निर्बंध असावा. खाण्या-पिण्यावर निर्बंध पाळत असताना उपवासाचे निरनिराळे पदार्थ सेवन करून जिभेचे चोचले पुरवायचे असे उपवास बरोबर नाही.

कितीही शपथ घेऊन उपवासाचे व्रत घेतलेले असले तरी वृद्ध वा आजारी व्यक्‍तींनी उपवास न करणेच श्रेयस्कर असते. अशांनी डॉक्‍टरांचा सल्ला घेऊनच उपवास करावा. एकूणच उपवासाचे महत्त्व खूप आहे, कारण त्याची फलश्रुती आहे आत्मदर्शन, आत्ममीलन व परमशांती. उपवासामुळे आत्मयोग साध्य होतो आणि शरीर, मन व आत्म्याचे संतुलन होते. एकूण उपवासाचे महत्त्व अवर्णनीय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT