No-Cook Summer Recipes for Kids sakal
फूड

No-Cook Summer Recipes for Kids: उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत करा 'या' 4 झटपट नो-कूक रेसिपीज! आहेत अतिशय सोप्या

Child-Friendly No-Cook Drink Recipes: उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत करता येतील अशा झटपट, स्वादिष्ट आणि चुलीशिवाय तयार होणाऱ्या रेसिपीज!

सकाळ वृत्तसेवा

Easy and Safe Recipes Kids Can Make: उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचं घरभर बागडणं, खेळणं, नवनवीन कल्पना सुचवणं हे नेहमीचं दृश्य असतं. सुट्टी म्हणजे मुलांसाठी आनंदाची पर्वणी! पण या सुट्टीत मुलांना सतत टीव्ही किंवा मोबाईलपासून दूर ठेवणं आणि त्यांच्या उर्जेचा सकारात्मक उपयोग करणं हे प्रत्येक पालकासाठी आव्हान असतं. अशावेळी त्यांना एखाद्या सर्जनशील आणि शिकवणूक देणाऱ्या उपक्रमात गुंतवणं खूप महत्त्वाचं ठरतं.

स्वयंपाक हा असाच एक छान पर्याय आहे, ज्यातून मुलांना मजा, स्वावलंबन आणि चवदार अनुभव एकत्र मिळतो. त्यामुळेच खास मुलांसाठी आणि त्यांच्यासोबत करता येतील अशा काही नो कूक म्हणजेच गॅस न वापरता करता येणाऱ्या भन्नाट रेसिपीज आम्ही घेऊन आलो आहोत. या रेसिपीज केवळ सोप्या नाहीत तर चविष्टही आहेत, आणि मुलांना स्वयंपाकात रस वाटावा अशा देखील आहेत.

पाईनॅपल डिलाईट

साहित्य

- 1 कैरी किसून

- 2 कप अननसाच्या फोडी

- 1 कप साखर

- मीठ

- थोडं पाणी

कृती

सर्व मिक्‍सरमध्ये घुसळा. मोठ्या गाळण्याने गाळून गार करा.

मगज सरबत

साहित्य

- खरबूज

- 2 टे. स्पून साखर

- थोडं पाणी

कृती

खरबूज कापल्यावर बिया व आतला रस असतो तो मिक्‍सरमध्ये घाला. 2 टे. स्पून साखर, थोडं पाणी घालून मिक्‍सर फिरवा. गाळून घ्या. खरबूजाच्या बियांना "मगज' म्हणतात. त्या मिक्‍सरमध्ये छान वाटल्या जातात. अतिशय सुरेख रंगाचं व चवीचं सरबत तयार होतं. बर्फ घालता येईल.

जिरापानी

साहित्य

- अर्धा कप चिंच

- 3 कप पाणी

- 7-8 पुदिन्याची पानं

- 1 चमचा पादेलोण

- अर्धा चमचा लिंबाचा रस

- अर्धा चमचा तिखट

- 1 चिमूट गरम मसाला

- 1 टे. स्पून साखर

- कोंथिबीर चिरून

कृती

चिंच भिजवून पाणी घालून गाळून घ्या. सर्व साहित्य घाला. पुदिना व कोंथिबीर पेरा. खूप गार करा. किंवा बर्फ घाला. (पाणी पुरीच्या पुऱ्यात भरून खा) किंवा पेय म्हणून प्या.

कसाटा आईस्क्रीम (मोठ्या मुलांसाठी)

साहित्य

- अर्धा कप पिठीसाखर

- 1 कप क्रीम किंवा मलई

- 4 अंड्यांतला फक्त पांढरा बलक

- 4 टे. स्पून केकचा चुरा

- 1 टे. स्पून बारीक चिरलेले काजू

- व्हॅनिला इन्सेन्स अर्धा चमचा.

कृती

पाव कप साखर मलईत घाला. पाव कप साखर, इन्सेन्स पांढऱ्या बलकात मिसळा. दोन्ही वेगवेगळं घुसळून घ्या. डब्यात तळात दोन्ही मिश्रण घाला. त्यावर केक व काजूचा थर, पुन्हा मलई व अंड्याचं मिश्रण, असे थर द्या. 2 ते 3 तासांत कसाटा तयार. वर चॉकलेट किसून घाला. सर्व्ह करा.

(सकाळ अर्काईव्हमधून)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT