Anda Curry Recipe
Anda Curry Recipe esakal
फूड

Anda Curry Recipe : नवऱ्याची बाहेर खायची सवय मोडायची असेल तर घरीच बनवा हॉटेल स्टाईल अंडा करी!

Pooja Karande-Kadam

Anda Curry Recipe : अंडी खाण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. यात काही शंकाच नाही. अंडी खाण्यामुळे होणा-या फायद्यांमध्ये वजन नियंत्रित ठेवणे, डोळ्यांचे आरोग्य सुधारणे, प्रोटीन आणि ओमेगा -3 अ‍ॅसिडसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश होतो.

जर अंड्याच्या पोषक तत्वांबद्दल किंवा फॅक्टबाबत पाहायला गेलं तर ते प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत आहे, तसेच त्यात व्हिटॅमिन बी 12, बायोटिन, थायामिन आणि सेलेनियम असते. अंडे खाणं शरीराकरता उपयुक्त आहे. भरपुर प्रथीनांचा समावेश अंडयात आढळतो, रोज किमान एक अंड खाणं फायदेशीर समजल्या जातं.

सकाळी आॅफीसला जातांना ब-याचदा आपण घाईत असतो नाश्ता करण्याकरता देखील पुरेसा वेळ आपल्याजवळ नसतो तेव्हा किमान एक उकडलेले अंडे खाउन जरी घराबाहेर आपण पडलो तर दिवसभराच्या कामाकरता चांगली एनर्जी आपल्याला मिळते.  

अंड्याची भाजी ही अशी भाजी आहे जी तुम्ही अगदी कमी वेळात बनवू शकता. तुम्ही जर कोलाजचे विद्यार्थी असाल किंवा ऑफिसला जाणारे लोक असाल आणि तुम्हाला उशीर होत असेल तर अशा वेळी तुम्ही अंडी अगदी कमी वेळात शिजवू शकता. की भाजी करता येते. अंडी करी रोटी, भातासोबत खाऊ शकता. यामध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ग्रेव्ही कमी किंवा वाढवू शकता.

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ही म्हण बहुतेकांनी ऐकलेली आहे आणि डाॅक्टर देखील अंडे खाण्याचा सल्ला देत असतात. पण रोज अंडे खाउन देखील कंटाळा येतो पण जर अंडयाच्या वेगवेगळया डिश करता आल्या तर खायला सुध्दा मजा येईल. चला तर मग आज एक नवी अंडयाची रेसीपी इंडियन एग करी कशी बनवायची ते पाहुया.

अंड्याची करी बनवण्यासाठी लागणारे साहीत्य

साहित्य:- अंडी: 6, चिरलेला कांदा 2, हिरव्या मिरच्या 4, आले लसूण पेस्ट 2 चमचे, 2 टोमॅटोची पेस्ट, जिरे 2 चिमूट, गरम मसाले, धने, तिखट 1 चमचा, हळद’’ 1 चमचे धणे पावडर: 1 चमचे गरम मशाले, 1 चमचे मीठ, चवीनुसार तेल, 100 ग्रॅम मेथीची पाने (पुदिन्याचे पान)

कृती

- उकडलेल्या अंडयांची सालं काढुन अंडे एकीकडे ठेवावे, जर पनीर चा उपयोग करणार असाल तर त्यांचे छोटे छोटे तुकडे कापुन घ्या सोनेरी रंगावर तळुन घ्या आणि बाजुला ठेवा.

- आता कांदा लसुण अदरक आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट बनवुन घ्या.

- कढईत तेल गरम करून त्यात कांदयाची पेस्ट आणि लसणाची पेस्ट टाका आणि सोनरी रंग येईपर्यंत तळुन घ्या.

- त्यात गरम मसाल्या व्यतिरीक्त मीठ हळद धणे पावडर आणि लाल तिखट टाका आणि 1 मिनीटापर्यंत तळुन घ्या आणि मग टोमॅटो ची पेस्ट टाका. जोपर्यंत पेस्ट त्या मसाल्यात पुर्णपणे मिक्स होत नाही आणि तेल सोडत नाही तोपर्यंत तळत राहा.

- आता त्यात 1 कप पाणी टाका आणि मिश्रण कोरडे होईपर्यंत शिजु दया.

- त्यात पनीर चे तुकडे हिरवे मटार आणि उकडलेली अंडी टाका.

- आता त्यात 1 कप पाणी आणखीन टाका आणि मंद आचेवर उकळु दया. 15 मिनीटे वाट बघा.

आता त्यात गरम मसाला आणि कोथिंबीर टाका आणि आमची अंडी करी तयार आहे. त्यात गरम मसाला आणि कापलेल्या कोथींबीरीने सजवा आणि गरम गरम पराठे, पोळी, किंवा भाता सोबत सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT