Angarki Chaturthi esakal
फूड

Angarki Chaturthi : अंगारकी चतुर्थी निमित्त फराळासाठी बनवा खास उपवसाची इडली

मराठी हिंदू कॅलेंडरनुसार, दर महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी असते

सकाळ डिजिटल टीम

Angarki Chaturthi : मराठी हिंदू कॅलेंडरनुसार, दर महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी असते, जर ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी खूप चांगली असते, ज्यांना चतुर्थीचे उपवास सुरू करायचे असतात त्यांना त्याची सुरुवात अंगारकीनेच करावी लागते.

या दिवशी गजाननाची मनापासून आराधना केली तर मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. अशात फराळाला नक्की काय करावं हा प्रश्न असेल ना? तुम्ही कधी उपवसाची इडली खाल्ली आहे का? ट्राय करा ही हटके रेसिपी

साहित्य:

- 1 वाटी वरीचे तांदूळ

- 1 वाटी साबुदाणा पीठ

- एक इनोचे पाकिट

- चवीनुसार मीठ

- हिरव्या मिरच्या साधारण दोन बारीक कापलेल्या

- पाव चमचा अर्धवट कुटलेले जिरे

कृती:

- एका मोठ्या बाऊलमध्ये भगर अर्थात वरीचे तांदूळ आणि साबुदाणा पीठ पाणी घालून व्यवस्थित दोन तास भिजवून ठेवा.

- भगरीतले पाणी काढून मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्या आणि साबुदाण्याचीही पेस्ट करून घ्या.

- या दोन्ही पेस्ट एकत्र करून त्यात मीठ, जिरे आणि हिरव्या मिरच्या घाला; त्यामध्ये थोडेसे इनो मिक्स करा. जेणेकरून इडल्या फुगायला मदत मिळेल

- इडली पात्रात पाणी घालून नंतर त्यामध्ये पाणी उकळू द्या. इडलीच्या भांड्याला तेलाचा हात लावा आणि हे सारण त्यामध्ये भरा

- त्यानंतर साधारण 10-15 मिनिट वाफ घेऊन इडली शिजवून घ्या. नंतर झाकण उघडून इडल्या काढून घ्या

सांबार

साहित्य:

- पाव वाटी शेंगदाणे

- 1 हिरवी मिरची

- 1 चमचा आलं

- 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट

- 1 चमचा चिंचेचा कोळ

- पाव चमचे जिरे

- पाव वाटी उकडलेले बटाट्याचे तुकडे

- पाव चमचा तिखट

- मीठ आणि गूळ चवीनुसार

- तेल

- जिरे

कृती:

- शेंगदाणे एक तास भिजवा आणि मग त्यातील पाणी काढून जिरे घालून मिक्सरवर वाटा

- एका कढईत तेल तापवा. त्यात मिरची फोडून घाला. आलं आणि मिरची पेस्ट घालून परतवा आणि त्यावर तिखट घाला

- दाण्याची पेस्ट टाकून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला

- बटाट्याच्या फोडी घालून मिक्स करा. वरून चिंचेचा कोळ, गूळ आणि मीठ घालून मिक्स करा आणि उकळी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina Death Sentence Demand : ''शेख हसीना यांना मृत्युदंड द्या'' ; बांगलदेशच्या 'ICT' मुख्य अभियोक्त्यांची मागणी!

Gautami Patil Latest Update : अखेर गौतमी पाटीलने ‘त्या’ रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांची घेतली भेट अन् अपघात प्रकरणावर पडला पडदा!

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून सोलापूरच्या भोंदूबाबाने ‘इतक्या’ लोकांना १५ कोटींना गंडविले; एकजण वकील म्हणून कायदेशीर बाजू सांभाळायचा तर...

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

सोलापूर जिल्ह्याचा ८६७ कोटींचा प्रस्ताव! अतिवृष्टी, महापुराचा ७,६४,१७३ शेतकऱ्यांना फटका; कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश?, वाचा...

SCROLL FOR NEXT