या भांड्यामधला स्वयंपाक ठरु शकतो विषारी Esakal
फूड

‘या’ भांड्यामधील स्वयंपाक ठरू शकतो विषारी, त्वरित बदला Utensils

ज्या धातूच्या भांड्यात आपण स्वयंपाक करत असतो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. असे अनेक धातू आहेत. ज्याच्या भांड्यांमध्ये स्वयंपार केल्यास पदार्थामधील पोषक तत्व तर नष्ट होतातच शिवाय या भांड्यामधील जेवण काहीवेळेस शरीरासाठी हानीकारकही ठरू शकतं

Kirti Wadkar

स्वयंपाक करताना आपण अनेक गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असतो. भाज्या स्वच्छ धूवून घेणं. ज्या पातेल्यामध्ये ते शिजणार आहेत ते पातेलं Utensils स्वच्छ आहे की नाही हे पाहणं. पदार्थ किंवा स्वयंपाक पोषक असावा यासाठी देखील आपण अनेकदा खबरदारी घेतो. Marathi Kitchen Hacks best utensil for cooking food Which is the best utensil for cooking food?

आपण पोषक मुल्यं मिळविण्यासाठी वेगवेगळ्या आणि चांगल्या भाज्यांची Vegetables निवड करतो. मात्र ज्या पातेल्यामध्ये तुम्ही हा पदार्थ शिजवणार आहात. त्या पातेल्याच्या धातूबद्दल Metal तुम्ही कधी विचार केला आहे का?

ज्या धातूच्या भांड्यात आपण स्वयंपाक करत असतो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. असे अनेक धातू आहेत. ज्याच्या भांड्यांमध्ये स्वयंपार केल्यास पदार्थामधील पोषक तत्व तर नष्ट होतातच शिवाय या भांड्यामधील जेवण काहीवेळेस शरीरासाठी हानीकारकही ठरू शकतं. या भांड्यातीलमध्ये पदार्थ शरीरासाठी विषारी ठरू शकतात. त्यामुळेच या भांड्याचा वापर योग्य प्रकारे करणं किंवा ही भांडी वापरणं बंद करावं. 

हे देखिल वाचा-

तांबे- तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणं किंवा जेवणासाठी तांब्याचं ताट वापरणं आरोग्यासाठी चांगलं असतं. मात्र स्वयंपाकासाठी तांब्याचं पातेलं वापरणं जीवघेणं ठरू शकतं. तांब्याचा जास्त तापमानाशी संबध आला की त्यात रासायनिक बदल घडतात. खास करून मीठ आणि अॅसिडशी गरम तांब्याचा संपर्क आला की काही केमिकल तयार होण्यास सुरूवात होते. त्यामुळेच तांब्याचं भांड योग्य प्रकारे न वापरल्यास त्यातील पदार्थ आरोग्यासाठी विषारी ठरू शकतात.Toxic Cookware 

अॅल्यूमिनियम- ऍल्यूमिनिमची भांडी लवकर तापतात आणि मजबूत असतात. यामुळेच अनेकजण स्वयंपाकासाठी ऍल्यूमिनियमची भांडी किंवा पातेली वापरणं पसंत करतात. मात्र गरम झाल्यानंतर ऍल्यूमिनियमचा ऍसिड असलेल्या म्हणजेच टॉमॅटो किंवा विनेगर अशा पदार्थांशी संबध आल्यास रासायनिक प्रभाव पडतो. 

धातूची प्रतिक्रिया पदार्थाला विषारी बनवू शकतात.यामुळे पोटात दुखू शकतं किंवा मळमळ जाणवू शकते. ऍल्यूमिनियम असा धातू हा जो जेवणावाटे हळूहळू तुमच्या पोटात जात असतो. ज्याचे कालांतराने आरोग्यावर दुष्परिणाम दिसू लागतात. 

पितळ- पितळेची भांडी वजनाने खूपच जड असतात. खास करून अनेक पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी अनेकजण या भांड्यांचा वापर करतात. चिकन, मटन किंवा बिर्याणी असे काही पदार्थ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. यासाठीच अनेक ठिकाणी हे पदार्थ बनवण्यासाठी पितळ्याच्या भांड्यांचा वापर केला जातो.

पितळ्याची भांडी गरम झाल्यावर त्यात अॅसिडवाले पदार्थ बनवल्यास केमिकल रिऍक्शन होवू शकते. त्यामुळेच पितळ्याच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणं टाळणं जास्त हिताचं ठरेल. भात शिजवण्यासाठी किंवा एखादा पदार्थ तळण्यासाठी पितळ्याची भांडी वापरता येतात. 

नकली स्टीलची भांडी- स्टीलच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. स्टेनलेस स्टील हे अनेक धातूंचं मिश्रण असत. यात क्रोमियम, निकल, सिलिकॉन आणि कार्बन यांचा समावेश असतो. यामुळेच स्टीलचं भांडं खरेदी करताना ते नीट पारखून खरेदी करणं गरजेचं आहे. कारण काही वेळेस यातही भेसळ असू शकते. नकली स्टीलची भांडीदेखील आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात. 

हे देखिल वाचा-

नॉन-स्टीक- अलिकडे नॉन-स्टीक भांड्यांचा वापर वाढत चालला आहे. कमी तेलात अन्न पदार्थ न जळता शिजत असल्याने अनेकजण या भांड्यांना पसंती देत आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का, की ही भांडी तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या केमिकल्समुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळेच हे भांड तापल्यावर त्याचून निघणाऱ्या धुरामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. harmful metals to avoid,

तसचं नॉन-स्टीक भांडी जुनी झाल्यानंतर त्यावर ओरबडे उठतात. त्यामुळे त्यावरील थर अन्नातून पोटात जाऊ शकतो. तसचं आतील आवरणातील धुरामुळे देखील अनेक गंभीर आजार होवू शकतात. यात यकृत आणि टेस्टिकुलर कर्करोग होवू शकतो. तसचं गर्भवती महिलांच्या आरोग्यावर आणि गर्भाच्या मेंदूवरही परिणाम होवू शकतो.  non-stick pans  

यासाठीच स्वयंपाकासाठी योग्य धातूची भांडी निवडणं गरजेचं आहे. पदार्थ शिजवण्यासाठी मातीची भांडी हा पारंपरिक पर्याय सर्वात उत्तम आहे. मात्र ही भांडी वापरताना मोठी काळजी घ्यावी लागते. ती फुटण्याची शक्यता असते. अशा वेळी लोखंडी भांडी किंवा बिडाची भांडी त्याचसोबत उत्तम दर्ज्याची स्टीलची भांडी वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT