Bread Chilla Recipe  esakal
फूड

Bread Chilla Recipe : बेसन चिला खाऊन कंटाळला असाल तर ब्रेड चिला नक्की ट्राय करा!

थोडा बदल करून ब्रेकफास्टमध्ये ब्रेड चिला ट्राय करा

Pooja Karande-Kadam

Bread Chilla Recipe : बहुतेक लोक संध्याकाळी ब्रेकफास्टमध्ये किंवा स्नॅक्समध्ये बेसन चिला, रवा चिला वगैरे खातात, पण तुम्ही कधी ब्रेड चिला खाल्ला आहे का? जर तुम्ही खाल्ले नसेल तर या वीकेंडला ब्रेकफास्टसाठी ब्रेड चिला बनवून पहा.

अनेकदा लोक सकाळी ब्रेड अंडी, ब्रेड बटर किंवा टोस्ट, सँडविच खातात. यावेळी ब्रेड रेसिपीमध्ये थोडा बदल करून ब्रेकफास्टमध्ये ब्रेड चिला ट्राय करा. याची रेसिपी अतिशय सोपी असून त्यातील घटकही सहसा घरोघरी उपलब्ध असतात. चला तर मग जाणून घेऊया ब्रेड चिला बनवण्याची पद्धत.

ब्रेड चिला बनवण्यासाठी साहित्य

- ४ चिरलेला कांदे

- १/२ कप चिरलेले टोमॅटो

- बेसन - १/२ कप

- टोमॅटो - १ लहान

- बारीक चिरलेली कोथिंबीर - १ वाटी

- हिरवी मिरची - १ चिरलेले

- गाजर - १ लहान बारीक चिरलेली

- लाल तिखट - १ चमचा

- मीठ - चवीनुसार

- तेल - तळण्यासाठी

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात बेसन घालावे. त्यात लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करावे. कांदा, गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो अशा सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. बेसनात टाकून मिक्स करा.

आता त्यात थोडे पाणी घालून चांगले मिक्स करा. द्रावण जास्त पातळ किंवा जास्त जाड करू नका. आता त्यात ब्रेडस्लाइस घेऊन बुडवून घ्या.

कढई गॅसवर ठेवा आणि चांगले गरम करा. त्यात अर्धा चमचा तेल घालून ब्रेडस्लाइस कढईत टाका. दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत बेक करा.

ब्रेड चांगलं शिजल्यावर एका प्लेटमध्ये ठेवून गरमागरम सर्व्ह करा. हिरव्या किंवा लाल चटणीबरोबर तुम्ही ते खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT