Butter Chicken Momoz Recipe esakal
फूड

Butter Chicken Momoz Recipe : घरच्या घरी बटर चिकन मोमोज कसे बनवायचे? रेसिपी सोपी आहे का?

संध्याकाळ होताच भारतात सर्वत्र मोमोजचे स्टॉल सजतात

Pooja Karande-Kadam

Butter Chicken Momoz Recipe : आजकाल चायनीज पदार्थांमध्ये मोमोजचा ट्रेंड जास्त आला आहे. तुम्ही कोणत्याही शहरात कुठेही गेलात तरी तुम्हाला मोमोजचे भरपूर स्टॉल दिसतील. असे मोमोज बाजारात आले आहेत. ज्याबद्दल तुम्ही कधी ऐकलेही नसेल. व्हेज, पनीर, चिकन मोमोज व्यतिरिक्त आता चॉकलेट मोमोज देखील उपलब्ध आहेत.

मोमोज लोकांना खूप आवडत आहेत. भारतात लोक ते स्नॅक्स म्हणून घेऊ लागले आहेत. पूर्वी ही गोष्ट नेपाळ आणि तिबेटमध्ये प्रचलित होती. मोमो हा चिनी शब्द आहे ज्याचा अर्थ वाफवलेली कणीक असा आहे. आज आम्ही तुम्हाला बटर चिकन मोमोची रेसिपी सांगणार आहोत.

संध्याकाळ होताच भारतात सर्वत्र मोमोजचे स्टॉल सजतात. ज्यामध्ये लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. नेपाळमधून येणारे लोक येथे स्टॉल लावून मोमोजची भरपूर विक्री करत आहेत. इथे मोमोजची विविधता आता सर्व प्रकारात आली आहे. पूर्वीचे मोमो फक्त व्हेज आणि पनीरमध्ये मिळत होते, पण आता त्याचे अनेक प्रकार बाजारात पाहायला मिळत आहेत.

मोठ्या संख्येने लोक ते पसंत करत आहेत. त्याचप्रमाणे, एक बटर चिकन मोमोज देखील आला आहे, जो लोकांना खूप आवडतो. एकदा तुम्ही घरी बनवून बघा, तुम्हाला त्याची चवही आवडेल.

साहित्य :

आवरण बनविण्यासाठी :
1 वाटी मैदा,
दोन तृतियांश कप पाणी
चवीपुरते मीठ
4 मोठे चमचे गव्हाचे पीठ (वरून लावण्यासाठी)

सारण बनविण्यासाठी :
पाव किलो चिकनचा खिमा
1 चमचा बारीक कुटलेला लसूण
100 ग्रॅम लाल कांदे, बारीक चिरलेले
100 ग्रॅम मशरुम, बारीक केलेला (आवडत असल्यास)
मीठ आवश्यकतेनुसार
1 मोठा चमचा गोडेतेल
अर्धा चमचा काळ्या मिरीची पूड

कृती :

कणीक बनविणे :
1. मैदा व थोडे मीठ घ्या. एकमेकांत चांगले मिसळा.
2. पाण्याला उकळ्या येईपर्यंत ते तापवा.
3. हे उकळलेले पाणी मैद्यामध्ये घाला. मिसळून घ्या.
4. कणीक घट्ट मळून ती मऊसर बनवा.
5. ओल्या कपड्यामध्ये ही कणीक बांधून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवा.

सारण बनविणे :
1. दुसऱ्या एका भांड्यात, सारणासाठीचे सर्व जिन्नस एकत्र करून ढवळा व बाजूला ठेवून द्या.

सारण भरणे व वाफवणे :
1. कणीक पुन्हा परातीत काढून तिंबून घ्या.
2. कणकेचा रोल तयार करा आणि 2 सेंटीमीटर लांबीचे गोळे कापा. या गोळ्यांच्या 4 इंच व्यासाच्या पुऱ्या लाटा. पुऱ्यांवर वरून लावण्यासाठी गव्हाचे पीठ वापरा.
3. पुरीच्या मध्यभागी थोडे सारण ठेवा. पुरीच्या कडांना पाण्याचा हात लावा आणि बोटांच्या चिमटीत पकडून त्यांचा द्रोण बनवा. यापूर्वी कधीही हे काम केलेले नसेल, तर ही कृती सावकाश, काळजीपूर्वक करा. या द्रोणाच्या कडा एकमेकांवर दाबून अर्धचंद्राकृती करंजी तयार करा. करंजीच्या कडांवर कटर किंवा उलथने फिरवून त्यांचा आकार व्यवस्थित गोल करून घ्या.
4. कढईत एक कप पाणी घ्या. त्यावर चाळणी उलटी ठेवा किंवा स्टीमर वापरा.
5. चाळणीवर कोबीची पाने किंवा बटर पेपर अंथरा.
6. त्यावर आकार देऊन झालेले मोमोज् सावकाश ठेवा. चाळणीवर मोमोजची गर्दी होऊ देऊ नका.
7. कढईवर झाकण ठेवा. गॅसची आच मोठी ठेवून मोमोज 12 मिनिटे वाफवून घ्या.
8. गरम असतानाच हे मोमोज सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT