Cheez Dosa Recipe  esakal
फूड

Cheez Dosa Recipe : एखाद्या दिवशी नाश्त्याला चीज डोसा करून बघा, सगळे पिझ्झा,बर्गर विसरून जातील

रेसिपी सेम असली तरी डोश्याला नव्या पदार्थांचा तडका दिलाय,त्यामुळे टेस्ट एकदम हटके आहे

Pooja Karande-Kadam

Cheez Dosa Recipe :

बहुतेक लोकांना हेल्दी नाश्ता करायला आवडते. जर नाश्ता हेल्दी असेल तर लोक दिवसभर एनर्जीने भरलेले राहतील आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतील. तज्ज्ञांच्या मते, नाश्ता करणं आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. काहींना नाश्त्यात पोहे खायला आवडतात, तर अनेकांच्या दिवसाची सुरुवात पराठ्याने होते.

लोकांना दररोज काही पदार्थ तयार करण्याचा कंटाळा येतो. अशा वेळी जर तुम्ही नाश्त्यात काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल तर चीज डोसा नक्की करून पहा. प्रसिद्ध दक्षिण भारतीय डिश चीज डोसा तांदूळ आणि उडीदपासून बनवला जातो. हा डोसा पोषक तत्वांनी समृद्ध आहे. तो तयार करणे देखील सोपे आहे.

आज आम्ही तुम्हाला चीज डोसा बनवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि कोणत्या रेसिपीने बनवता येईल ते सांगत आहोत.

चीज डोसा बनवण्यासाठी साहीत्य 

जर तुम्हाला 2-3 लोकांच्या नाश्त्यासाठी चीज डोसा बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 200 ग्रॅम चीज, 4 वाट्या तांदूळ, 2 वाट्या उडीद डाळ, 2 बारीक चिरलेले कांदे, 2 चमचे मेथीदाणे, 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या, 1 कप रिफाइंड तेल, 1 मूठभर कोथंबिर, आणि 1 चमचे मीठ (चवीनुसार).

या सोप्या रेसिपीने चीज डोसा तयार करा

चीज डोसा बनवण्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ घ्या. एक दिवस आधी पाण्यात भिजवून काही तास ठेवा. डाळी आणि तांदूळ वेगळ्या भांड्यात भिजवा. नंतर एक कप पाण्यात २ चमचे मेथी भिजवण्यासाठी ठेवा.

सर्वकाही नीट भिजल्यावर मेथी दाणे, तांदूळ आणि डाळी मिक्सरमध्ये घाला. नंतर तिन्ही गोष्टी नीट बारीक करून पेस्ट बनवा. आता या मिश्रणात मीठ घाला. ही पेस्ट जवळपास रात्रभर झाकून ठेवा. सकाळी तुमचा डोश्याचे पीठ तयार झाले आहे. 

सकाळी उठल्यावर चीज डोसा बनवण्यासाठी पॅन घ्या आणि मध्यम आचेवर ठेवा. त्यात थोडे तेल घालून गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावर डोस्यासाठी तयार केलेले पीठ घाला.

नंतर गोलाकार आकारात पसरवा. पॅनवर पिठात गोल करण्यासाठी तुम्ही चमचा किंवा इतर कोणतेही भांडे वापरू शकता. आता त्याच्या कडांवर थोडे तेल शिंपडा आणि थोडा वेळ शिजू द्या.

आता त्यात किसलेले चीज, चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला. ते अधिक मसालेदार बनविण्यासाठी, आपण त्यात हिरव्या मिरच्या देखील घालू शकता. चांगले शिजल्यावर ते पलटून तव्यातून काढून प्लेटमध्ये ठेवावे.

अशा प्रकारे तुमचा स्वादिष्ट आणि पौष्टिकतेने समृद्ध डोसा तयार होईल. डोसा खाण्यासाठी तुम्ही नारळाची चटणी, टोमॅटोची चटणी आणि सांबार तयार करू शकता. जर तुम्हाला सांबार बनवता येत नसेल तर तुम्ही दोन्ही चटण्यांसोबत डोसा चा आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 'आमा'चा जन्म भारतात.. त्यांना महिन्याला पैसे पाठवत होतो; गुहेतील महिलेच्या नवऱ्याचा दावा, कोण आहे ड्रोर गोल्डस्टीन?

Dindori Accident : मोटारसायकलला धडकताच नाल्यात कोसळली कार, बालकासह 7 जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Viral Video: बापरे...! अचानक पीएमटी बसचा ब्रेक झाला फेल, पुढे काय झाले पाहा

व्याख्या, विख्खी, वुख्खू! 'धूमधडाका'मधील धनाजीराव वाकडेंचं घरं कुठेय माहितेय का? घराची अवस्था पाहून तुम्हालाही धक्का बसेल

मोठी बातमी! 'बंगळूर चेंगराचेंगरीला RCB च जबाबदार', Virat Kohli चा व्हिडिओही अहवालात; कर्नाटक सरकारनं ठरवलं दोषी

SCROLL FOR NEXT