Chicken Masala Fry Recipe  esakal
फूड

Chicken Masala Fry Recipe : चिकन फ्राय करणं एकदम सोप्पय, रेसिपी पहाच!

आपण हे चिकन फ्राय रोटी, नान, चपाती किंवा ब्रेडसोबत साइड डिश म्हणून खाऊ शकतो

Pooja Karande-Kadam

Chicken Masala Fry Recipe : जगात काही लोक केवळ चिकन लव्हर असतात. अगदी मध्यरात्री देखील ते चिकन खायला तयार असतात. अशाच चिकन प्रेमींसाठी आम्ही आज चिकनची हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. बऱ्याचवेळा चिकन सुक्का, चिकन ६५ खाऊन कंटाळला असाल तर चिकन फ्राय घरीच कसं बनवायचं ते पहा.

अगदी सुटसुटीत आणि तेवढ्याच चवीने खाणाऱ्यांसाठी हा स्पेशल पदार्थ आहे. सोबत तांबडा-पांढरा रस्सा असेल आणि ग्रेव्हीची गरज नसेल तर चिकन फ्रायसारखा चविष्ट पदार्थ दुसरा नाही.

साहित्य

  1. बोनलेस चिकन 500 ग्राम

  2. लिंबूचा रस एक चमचा

  3. आलं-लसणाची पेस्ट एक चमचा

  4. लाल मिरची पावडर दोन चमचे

  5. मिरची पावडर एक चमचा

  6. जिरा पावडर अर्धा चमचा

  7. कॉर्नफ्लोर एक चमचा

  8. तांदळाचा पीठ एक चमचा

  9. अंडा एक

  10. कढीपत्ता सात आठ

  11. हिरवी मिरची 3

  12. तेल डीप फ्राय करण्यासाठी

  13. मीठ स्वादानुसार

कृती

सगळ्यात पहिल्यांदा चिकन पिस ला चांगले पाण्याने धुऊन घेणे. धून झाल्यानंतर चिकन चं पाणी सुकण्यासाठी ठेवणे. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची फ्राय करून घ्या. त्यानंतर एका भांड्या मध्ये चिकन पीस घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करून चांगले मॅरीनेट करून घेणे आणि दहा मिनिटासाठी एका बाजूला ठेवून देणे .

आता एका वाटीमध्ये कॉर्नफ्लोर , तांदळाचा पिठ , अंडा , आलं-लसणाची पेस्ट , लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घ्या. आता यामध्ये चिकन सिक्सटी फाय मसाला, जीरा पावडर, हळद पावडर आणि मीठ लावून चिकनला एका तासासाठी पुन्हा एकदा मॅरीनेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्या.

त्यानंतर गॅस वर कढाई ठेवून त्यामध्ये तेल ओतून घ्यावे. तेल चांगले गरम झाल्यानंतर मॅरीनेट केलेले चिकन पीस थोडे थोडे करून चांगले फ्राय करून घ्या.बारीक गॅसवर फ्राय करून घ्या म्हणजे ते क्रिस्पी होतात.

हे चिकन अतिशय स्वादिष्ट लागते. आवडत असल्यास लिंबू पिळून घ्यावे. मिरची पूड ऐवजी नेहमीचा मसाला घातला तरी चालेल. जेव्हा चिकन गोल्डन ब्राऊन होतो तेव्हा गॅस बंद करून चिकन प्लेट मध्ये काढून घ्या. नंतर चिकन ला फ्राय केलेला कढीपत्ता आणि हिरवी मिरची करून सर्व करा. आपण हे चिकन फ्राय रोटी, नान, चपाती किंवा ब्रेडसोबत साइड डिश म्हणून खाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT