Chocolate Cup Recipe
Chocolate Cup Recipe esakal
फूड

Chocolate Cup Recipe : यंदाचा बालदिन चॉकलेट फ्रूट कप बनवून करा साजरा

सकाळ डिजिटल टीम

Chocolate Cup Recipe : बालदिन आला की मुलांमध्ये वेगळीच मजा संचारते; त्यांना त्यांच्या बर्थ डे एवढीच याही दिवसाची ओढ असते. त्यात आपणही त्यांच्यासाठी बाहेर फिरायला जायचा; नवनवीन ठिकाणी खायला जायचा प्लॅन करतो; पण यावेळेस काहीतरी वेगळं होऊ शकत. यावेळेस तुम्ही त्यांच्यासाठी छोटीशी पार्टी ठेवू शकतात; ते आणि त्यांचे मित्र आणि गिफ्ट म्हणून त्यांना हे चॉकलेट पण देऊ शकतात.

मुलांना चॉकलेट खूप आवडतात. चॉकलेटपासून बनवलेले पदार्थ मुलं लगेच फस्त करतात. पण नुसतेच चॉकलेट त्यांच्यासाठी हानिकारक आहेत; कॅविटी देखील होऊ शकते. पण ही रेसिपी जरा वेगळी आहे.

चॉकलेट फ्रूट कप मध्ये फक्त चॉकलेट नाही तर वेगवेगळी फळे देखील आहेत, जेणेकरून पोषक तत्वे त्यांच्या शरीराला मिळतील.बनवायला सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी कशी बनवायची पाहून घ्या.

चॉकलेट फ्रूट कप बनवण्यासाठी लागणारं साहित्य

- डार्क चॉकलेट किंवा मुलांचे आवडते चॉकलेट

- सफरचंद

- द्राक्षे

- किवी

- काळी द्राक्षे

- अननस

- इतर आवडीचे फळ

- व्हॅनिला इसेन्स

- पिठीसाखर

- फ्रेश क्रीम किंवा व्हीप्ड क्रीम

- पुदिना

- सिलिकॉन मोल्ड

कृती

एका बाउलमध्ये डार्क चॉकलेट काढा. त्यानंतर चॉकलेट डबल बॉलिंगच्या पद्धतीने वितळून घ्या. जरा रूम टेमपरेचरला येण्यासाठी बाजूला ठेवून द्या. बाजारात सिलिकॉन मोल्ड मिळतो. या साच्यांमध्ये हे वितळले चॉकलेट घाला आणि फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेऊन द्या.

आता सर्व फळे कापून घ्या. द्राक्ष देखील अर्धी कापून घ्या. सफरचंद आणि किवीचे लहान तुकडे करा. अननसाचेही चौकोनी तुकडे करा. फळांचे काप झाल्यानंतर फ्रेश क्रीम घ्या, त्यात पिठीसाखर आणि व्हॅनिला इसेन्सचे काही थेंब टाकून फेटून घ्या, हे क्रीम पाइपिंग बॅगमध्ये भरून घ्या.

फ्रीजरमधून मोल्ड काढा. या साच्यांमधून चॉकलेट बाहेर काढा. बाहेर काढल्यावर चाॅकलेट बाऊलच्या आकाराप्रमाणेच राहतील. पाईपिंग बॅगच्या मदतीने या चॉकलेटमध्ये क्रीम भरा. मग त्यावर सर्व फळे ठेवा. फळांच्या वर एक थर क्रीम परत लावा. शेवटी कपला चॉकलेट किंवा रंगीत टॉफीने सजवा आणि पुदिनाचे पान ठेवा. अश्याप्रकारे स्वादिष्ट चॉकलेटी फ्रूट कप तयार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन; जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT