लज्जतदार फ्राईड राईस Esakal
फूड

Chinese Fried Rice: भात खूप शिल्लक राहिलाय? मग झटपट बनवा ही डिश

नेहमीच्या फोडणीच्या भाताएवजी हा लज्जतदार चायनिज फ्राइड राईस Chinese Fried Rice तुमच्या घरातील सदस्यांना देखील नक्कीच पसंतीस पडेल. अर्थात फ्राइड राईस बनवण्यासाठी शिळा किंवा शिल्लक राहिलेलाच भात असावा असं गरजेचं नाही

Kirti Wadkar

घरात स्वयंपाक Cooking करत असताना अनेकदा एखादी भाजी, आमटी किंवा भात शिल्लक राहतो. शिल्लक राहिलेली भाजी किंवा आमटी तर सहज पुन्हा गरम करून जेवणात खाता येते. मात्र भात पुन्हा गरम करणं तसं अवघड होतं. Cooking Tips Marathi how to make tasty Chinese rice

खरं तर भात Rice हा घराघरात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. भाताशिवाय तर अनेकांचं जेवणच पूर्ण होत नाही. घरातील गृहिणीला जेवणाचा Meal कितीही अंदाज असला तरी कधीतरी भात शिल्लक राहतोच. मग अशावेळी या भाताचा तुम्ही लज्जतदार फ्राइड राईस बनवू शकता.

नेहमीच्या फोडणीच्या भाताएवजी हा लज्जतदार चायनिज फ्राइड राईस Chinese Fried Rice तुमच्या घरातील सदस्यांना देखील नक्कीच पसंतीस पडेल. अर्थात फ्राइड राईस बनवण्यासाठी शिळा किंवा शिल्लक राहिलेलाच भात असावा असं गरजेचं नाही. अगदी काही वेळा हटके मेन्यू म्हणूनही तुम्ही घरीच चायनिज राईस बनवून कुटुंबियांना खुश करू शकता.

फ्राइड राईससाठी लागणारं साहित्य

फ्राइड राईससाठी लागणारं मुख्य साहित्य म्हणजे शिजवलेला ४ वाटी भात. तसंच २ चिरलेले कांदे, ७-८ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, आल्याचा लहान तुकडा बारीक चिरलेला, १ चिरलेली हिरवी मिरची, बारीक उभा चिरलेला कोबी, चिरलेली १ सिमला मिरची, १ गाजर चिरलेलं, चिरलेली कांद्याची पात एक वाटी, चिरलेली फरसबी म्हणजेच बीन्स

तसंच अर्धा चमचा चिली पावडर, अर्धा चमचा विनेगर, १ चमचा चिली सॉस, अर्धा चमचा सोया सॉस, केचअप, मीठ स्वादानुसार, तेल

हे देखिल वाचा-

फ्राइड राईसची कृती

एका कढईमध्ये २ चमचे तेल टाका. तेल तापल्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण आणि आलं टाकून चांगलं परतून घ्या.

त्यानंतर यात चिरलेला कांदा टाकून २-३ मिनिटांसाठी परतून मऊ होऊ द्या.

यात चिरलेली सिमला मिरची, गाजर आणि बिन्स टाकून २-३ मिनिटांसाठी परता. या भाज्या परतल्यानंतर कोबी टाकून पुन्हा १ मिनिटं परता. भाज्या जास्त मऊ शिजवू नका. त्या कुरकुरत राहतील याची काळजी घ्या.

आता या भाज्यांमध्ये थोडं मीठ घाला. त्यानंतर चिली सॉस, सोया सॉस आणि केचअप टाकून चांगलं मिक्स करा.

त्यानंतर यात शिजवलेला भात टाकून चांगलं मिक्स करा.

आता यात चिरलेली कांद्याची पात आणि विनेगर टाकून पुन्हा मिक्स करा चांगलं मिक्स करून घ्या.

२ मिनिटांसाठी झाकण ठेवा.

अशा प्रकारे चायनिज फ्राइड राईस सर्व करण्यासाठी तयार होईल. गरमा गरम या फ्राइड राईसची मजा लुटावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

SCROLL FOR NEXT