Monsoon Recipe esakal
फूड

Monsoon Recipe : काही स्पेशल हवे ? झटपट बनवा कॉर्न व्हेजी फिंगर

लहान मोठे सगळ्यांनाच रोज नाष्ट्यात काहीतरी वेगळे हवे असते. जर काही वेगळे खाण्याची इच्छा असेल तर हे झटपट बनणारे कॉर्न व्हेजी फिंगर नक्की ट्राय करा.

सकाळ डिजिटल टीम

कॉर्न व्हेजी फिंगर बनवण्यासाठी लागणारे सर्व सामग्री हेल्दी अणि टेस्टी असल्याने हेल्थ काँशियस आई साठी पण चांगला पर्याय आहे. मुलांना मधल्या वेळात काय वेगळे करून देणार याचा हा टेस्टी ऑप्शन आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच हे आवडते.

साहित्य

  • कॉर्न

  • बटाटा

  • गाजर

  • कोबी

  • पनीर

  • बटर

  • मीठ

  • काळी मिरे पूड

  • ब्रेड क्रम्ब्स

कृती

कॉर्न उकडून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवावी. पॅनमध्ये बटर टाकून ही पेस्ट फ्राय करावी. यात गाजर खिसून व कोबी बारीक चिरून घालावी. नंतर यात मिठ व काळी मिरे पूड घाला. मग उकडलेले बटाटे मॅश करून पनीर खिसून टाकावे. हे सर्व एका बाऊलमध्ये घेऊन नीट मिक्स करावे. मग फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून टाकावी आणि नीट मिक्स करावे.

आता हे मिश्रण हातावर घेऊन त्याला फिंगर्स सारखा आकार द्या. नंतर एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्ब्स घेऊन फिंगर्स त्यात घोळून घ्यावे. मग गरम तेलात हलक्या आचेवर तळून घ्यावे. तुमचे कॉर्न व्हेजी फिंगर तयार. याला मेयोनीज किंवा टोमॅटो सॉस सोबत खावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT