Dhokla Khandvi Icecream Roll google
फूड

कहरच! ढोकळा खांडवी रोल आइस्क्रीम रोल पाहून नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया

मसाला डोसा आइस्क्रीम बनविणाऱ्या दिल्लीतल्या माणसाने ही डिश बनवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

याआधी, मसाला डोसा आइस्क्रीम, मोमोज आइस्क्रीम, समोशात गुलाबजामचे सारण, रुह अफजा घालून केलेली मॅगी आणि चहा, जिलबी चाट, ओरिओ बिस्कीट भजी असे अनेक पदार्थ व्हायरल झाले आहेत. हे पदार्थ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मसाला डोसा आणि मोमो आइस्क्रीमच्या धक्क्यातून नेटकरी बाहेर येत नाहीत तोवर पुन्हा एका अशाच विचित्र आइस्क्रीमचा (Icecream) व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. दिल्लीतल्याच मसाला डोसा आइस्क्रीम रोल बनविणाऱ्या व्यक्तीने आता काय तर ढोकळा खांडवी रोल आइस्क्रीम करून कहरच केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी अतिशय संतप्त झाले आहेत. (Weird Food Viral Video)

हा व्हायरल व्डिडिओ द ग्रेट इंडियन फूडीने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, विक्रेता गुजराती ढोकळा आणि खांडवीचा आधार म्हणून आइस्क्रीम रोल बनवतो आहे. त्याने ढोकळा आणि व्हॅनिला आइस्क्रीमच्या एकत्र करून त्या मिश्रणातून रोल बनवले. ढोकळ्याचे आणखी काही तुकडे आधीच भरलेल्या प्लेटमध्ये जोडले. सर्व्ह करण्यापूर्वी, त्याने ढोकळ्याचे तुकडे आणि मिरचीने सजवले. अशाचप्रकारे त्याने खांडवी रोल तयार केला. (Weird Food Viral Video)

हा व्डिडिओ पोस्ट केल्यानंतर, व्हिडिओला जवळपास ५ लाखांपेक्षा व्ह्यूज मिळाले आहेत. या विचित्र प्रयोगामुळे नेटिझन्स संतापले असून त्यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Weird Food Viral Video)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT