Dessert For Winter  esakal
फूड

Dessert For Winter : थंडीत डेझर्ट खावस वाटत आहे? मग खा पौष्टिक फालुदा

आपल्यासारखे खवय्ये पोटासाठी नाही, तर जिभेसाठी खात असतात

सकाळ डिजिटल टीम

Dessert For Winter : आपल्यासारखे खवय्ये पोटासाठी नाही, तर जिभेसाठी खात असतात. सध्या थंडीचा मोसम आहे. शक्यतो हिवाळ्यात शरीरात उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांना आणि उन्हाळ्यात थंडावा आणणाऱ्या पदार्थांना जास्त पसंती दिली जाते.

पण याला अपवादही असू शकतात. फालुदा हा खूप जास्त लोकांना आवडणारा पदार्थ आहे. डेझर्ट म्हणून लोकांना फालुदा खूप आवडतो. शिवाय यात शेवया, सुका मेवा आणि दूध असल्यामुळे हा तितकाच पौष्टिक सुद्धा असतो. त्यामुळे तुम्ही थंडीत हा पदार्थ आइस्क्रीम ला सप्लीमेंट म्हणून खाऊ शकतात.

फालुद्याची रेसिपी

साहित्य

- २ मध्यम बाऊल व्हॅनिला आईस्क्रिम

- १ वाटी फालूदा शेव

- गुलाबाचे सरबत

- अर्धा कप ताजे क्रीम

- १ लिटर दूध

- २ छोटे चमचे गुलाब इसेन्स

- १/२ वाटी बदाम व पिस्ते

- चार मोठे चमचे साखर

कृती

- दूधात साखर घालून दूध आटवून घ्या.

- थंड झाल्यावर त्यात गुलाब इसेन्स घाला.

- फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

- फालुदा शेवया शिजवून घ्या.

- सर्व्ह करतांना आईस्क्रिमच्या किंवा काचेच्या ग्लासमध्ये गुलाब सरबत, मग फालूदा शेवया, नंतर त्यावर गार केलेले दूध घाला.

- नंतर व्हॅनिला आईस्क्रिम घालून त्यावर क्रीम घालून वर बदाम पिस्ते घालून सजवा.

- यामध्ये तुम्हाला आवडणारा आईस्क्रीम फ्लेवर, इसेन्स घालून त्याची चव वाढवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT