anarasa Esakal
फूड

Diwali 2022: माता पार्वतीने भगवान शंकरांना अर्पन केलेली बिहारची मिठाई आपल्या फराळात कशी ; पाहुया अनारशांचा प्रवास!

आपल्याकडे हा दिवाळीचा एक खास पदार्थ म्हणून ओळखला जातो. तर बिहार आणि उत्तर भारतात अधिक लोकप्रिय आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनारसे हा तांदळाचे पीठ, तीळ आणि साखरेपासून बनवलेला गोड पदार्थ आहे. आपल्याकडे हा दिवाळीचा एक खास पदार्थ म्हणून ओळखला जातो. तर बिहार आणि उत्तर भारतात अधिक लोकप्रिय आहे. अनारसे दोन प्रकारचे बनतात. गोल वड्यासारखे आणि सपाट पुरीसारखे या दोन्हीची चव सारखीच आहे. या पदार्थाशी संबंधीत एक पौराणीक कथाही सांगितली जाते. 

महाराष्ट्रात अनारसे हे केवळ दिवाळीच्या दिवसात फराळातच असतात. बिहारमध्ये या अनारशांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अनारसे आपल्याकडे बिहारकडून आपल्या फराळात आला असे म्हणायला काही हरकत नाही. 

पौराणिक मान्यता

बिहारमध्ये अनारसाशी संबंधित एक मान्यता सांगितले जाते. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी माता पार्वती तप करत होत्या. अनेक वर्ष तप केल्यावरही भगवान शंकर काही प्रसन्न होईनात. त्यावेळी पार्वतीजींनी महादेवाच्या पिंडीचा पूजा केली. त्या पूजेला माता पार्वतींनी प्रसाद म्हणून अनारसे अर्पण केले. 

बिहारमध्ये श्रावणात करतात अनारसे 

श्रावण हा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात उपवास आणि अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. याच महिन्यात बिहार आणि उत्तर भारतात अनारसे केले जातात. 

अनारशांचे प्रकार

अनारशाचे अनेक प्रकार आता आले आहेत. घराघरातल्या गृहीणींनी ते शोधून काढले आहेत. यामध्ये नव्या पद्धतीनुसार दह्याचे, केळीचे,खव्याचे  अनारसे बनवले जातात. डायट करणाऱ्या लोकांसाठी बेक्ड अनारसेही केले जातात. बिहारमध्ये मावा, खवा यांचेही मऊसूत अनारसे केले जातात. या पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लवकर खराब होत नाहीत. त्याचे तयार पीठही बरेच दिवस टिकते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT