kothimbir chivda
kothimbir chivda esakal
फूड

Diwali Festival 2021 : खमंग कोथिंबीर चिवडा, वाचा रेसिपी

सकाऴ वृत्तसेवा

चिवडा हा अनेकांचा आवडीचा पदार्थ

प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीच्या फराळाची सुरुवात झाली असेलच? बरोबर ना. सगळ्यांच्या घरी गोड पदार्थ बनवण्याची रेलचेल सुरुय. त्यात चिवडा हा अनेकांचा आवडीचा. दिवाळीतील चटकदार आणि 'करावा तसा आवडणारा' अशा प्रकारातील हा पदार्थ आहे. चिवडा नुसताही खाता येतो किंवा भेळ, मिसळ, दहीभात यांचा लज्जतही वाढवते. चला तर मग त्यातीलच कोथिंबीर चिवडा याची रेसिपी जाणून घेऊयात.

साहित्य

- अर्धा किलो जाड पोहे

- अर्धा चमचा आमचूर

- एक चमचा पिठीसाखर

- आठ-दहा मिरच्या

- पुदिना

- दोन चमचे धणे पावडर

- एक वाटी चिरलेली कोथिंबीर

- बारीक चिरलेल्या सात-आठ हिरव्या मिरच्या

- दीड चमचा मीठ

- फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे-मोहरी-हळद

- एक चमचा पिठीसाखर

- आठ-दहा मिरच्या

- मूठभर पुदिना

कृती

- सुरवातीला पोहे तळून घ्या.

- पुदिना व मिरच्या एकत्र वाटून प्लेटमध्ये पसरुन ठेवा. दोन-तीन तास सुकवा

- फोडणीसाठी पाव वाटी तेल घेऊन त्यात जिरे-मोहरी घालून त्यावर वाटण परतून मंद आचेवर कुरकुरीत किंवा सुके करा. नंतर मीठ, साखर, जिरेपूड, आमचूर व तीळ घालून जरा परतून उतरवून घ्या.

- त्यात पोहे घालून सर्व नीट हलवा.

- तयार चिवडा गार झाल्यावर डब्यात भरा.

(संदर्भ: पुस्तक- दिवाळी फराळ, सकाळ प्रकाशन, लेखिका-जयश्री कुबेर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT