Diwali Recipe Shevanti esaka
फूड

Diwali Recipe : दिवाळीच्या फराळातली शेवंती तुम्हाला माहितीये का? चला रेसिपी जाणून घेऊ

सकाळ डिजिटल टीम

Diwali Recipe : दिवाळीच्या फराळात शेव, चिवडा, चकली, करंजी असे पदार्थ सर्वत्र बनविले जातात. मात्र तुम्हाला दिवाळीच्या फराळात शेवंती हा कसा बनवतात हे माहिती आहे का? चला तर जाणून घेऊ यंदाच्या दिवाळीसाठी शेवंतीची ही खास रेसिपी.

(Diwali Festival food Shevanti Recipe 2022 preparation)

साहित्य -

रवा - २५० ग्रॅम, गुळ - २५० ग्रॅम, तुप - २ चमचे, वेलची पावडर - अर्धा चमचा, गव्हाचे पीठ, तेल - २५० ग्रॅम, मीठ, पाणी.

कृती -

शेवंती बनविण्यासाठी सर्वप्रथम गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि तेलाचे मोहन घालावे. यानंतर पाण्याच्या साहाय्याने पीठ मळून घ्यावे. त्यानंतर साधारण २० मिनीटे हे पीठ मुरण्यासाठी झाकून ठेवावे. पीठ मुरते आहे तोवर आपण त्याचे सारण तयार करुन घेऊ.

सारण तयार करण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यात दोन चमचे तुप टाकून गरम करावे. त्यानंतर आपल्याकडीस गुळ किसून घ्यावा. गरम झालेल्या तुपात रवा भाजून घ्यावा. रवा छान खरपुस भाजून झाल्यानंतर त्यात किसलेला गुळ घालावा. सारण एकत्र करुन घ्यावे.

शेवंतीसाठी भिजवून ठेवलेली कणिक घेऊन त्याची पोळी लावाची त्यात रव्याचे तयार केलेले सारण टाकून त्याला कचोरी प्रमाणे लाटून घ्यावे. अशाप्रकारे सर्व पिठाच्या शेवंती तयार करुन घ्याव्या. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून तेल गरम करुन घ्यावे, त्यात तयार केलेल्या शेवंती तळून घ्याव्या. लक्षात ठेवा शेवंती तळताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. छान सोनेरी रंग आल्यानंतर कढईतून काढून घ्यावे. दिवाळीच्या फराळासाठी आपली शेवंती तयार आहे.

रेसिपी - सौ. संगिता संगमनेरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT