Apple Rabdi sakal
फूड

फराळ करताना गोडधोड हवं! जाणून घ्या सफरचंदाची रबडी कशी करायची?

उपवासासाठी फराळाचे पदार्थ करताना त्यात काही तरी गोडधोड पदार्थ असावा, असं गृहिणींना वाटतं.

सकाळ डिजिटल टीम

आज आषाढी एकादशी आहे. उपवासासाठी फराळाचे पदार्थ करताना त्यात काही तरी गोडधोड पदार्थ असावा, असं गृहिणींना वाटतं. पण तुम्हाला उपवासाला चालेल असा पदार्थ सुचत नाही?तो पदार्थ सुचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आषाढी एकादशी स्पेशलमध्ये फराळ रेसिपी सफरचंदाची रबडी कशी तयार करायची ते आपण पाहणार आहोत.

सफरचंद रबडीसाठी लागणारे साहित्य:

1) क्रिम मिल्क

2) साखर

3) बदाम कापलेले

4) वेलची पावडर

5) सफरचंद

6) दूध

कृती :

  • सर्वप्रथम सफरचंद स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर त्याची साल काढून घ्यावी आणि ते सफरचंद किसून घ्यावं. तोपर्यंत गॅसवर दूध आटवायला ठेवावं (साधारण एक लीटरचे अर्धा लीटर होऊ द्या)

  • दूध घट्ट झाल्यावर त्यात किसलेले सफरचंद आणि साखर मिक्स करावी आणि त्याला छान उकळी येऊ दयावी.

  • उकळी आल्यावर त्यात वेलायची पावडर आणि काजू बदामचे काप टिकावे आणि पुन्हा दुधाला मंद आचेवर दहा मिनिटे ठेवावे.

  • अशापध्दतीने तुमची सफरचंद रबडी तयार झाली आहे.

  • तुम्ही ही सफरचंद रबडी गरमगरम खाऊ शकता अथवा फ्रिजमध्ये ठेऊन नंतर खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: दुष्काळात तेरावा! उपनगरात विजेचं महासंकट, तळोजा उपकेंद्रात भीषण आग; वीजपुरवठा खंडित

Pune: आंबेगावच्या मातीतून घडले शेतकरी कुटुंबातील चार पोलीस उपनिरीक्षक; वर्षभराचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

Shaktipeeth Highway Protest : "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची", शक्तिपीठ महामार्गाविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर

Navi Mumbai: डेटा सेंटरसाठी २८२ कोटींची जमीन, महामुंबईतील सर्वात महागडा व्यवहार

IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडचा १०० व्या सामन्यात शतकी धमाका! द्रविड-गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी

SCROLL FOR NEXT