Egg Lollipop Recipe Esakal
फूड

Egg Lollipop Recipe: घराच्या घरी क्रिस्पी एग लॉलीपॉप कसे तयार करायचे?

एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात.

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्हाला संध्याकाळच्या स्नॅकमध्ये नेहमीचे तेच ते पदार्थ बनवण्याचा कंटाळा आला असेल, तर तुमची चव सुधारण्यासाठी क्रिस्पी एग लॉलीपॉप ट्राय करा. हे टेस्टी इंडो चायनीज स्नॅक्स रेसिपी संध्याकाळचा नाश्ता किंवा डिनर पार्टी मध्ये स्टार्टर म्हणून देण्यासाठी परफेक्ट आहे. 

तुम्हाला माहिती  का,पृथ्वीवरील सर्वात पौष्टिक पदार्थांमध्ये अंड्यांची गणना केली जाते. एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया कसे तयार करायचे टेस्टी क्रिस्पी एग लॉलीपॉप. 

साहित्य:

1) 8 ते 10 उकडलेले अंडी

2) दोन कप मैदा

3) दोन चमचे कॉर्नफ्लोर

4) एक लाल मिरची पावडर

5) एक चमचा हळद 

6) एक चमचा काळी मिरी पावडर

7) एक चमचा आले-लसूण पेस्ट

8) एक बारीक चिरलेला कांदा

9) एक बारीक चिरलेली सिमला मिरची

10) दोन चमचे चिली सॉस

11) एक चमचा सोया सॉस

12) अर्धा हिरवी मिरची

13) कोथिंबीर

14) पाणी

कृती:

क्रिस्पी एग लॉलीपॉप बनवण्यासाठी प्रथम एक मोठा मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घाला. नंतर त्यात आले लसूण पेस्ट टाका आणि पाणी घालून चांगले मिक्स करा. आता उकडलेले अंडे पिठात बुडवून काही वेळ बाजूला ठेवा.

तळण्यासाठी कढईत तेल गरम करा. त्यात कोट केलेले अंडी घाला आणि 10 ते 12 मिनिटे तळून घ्या आणि टिश्यू पेपरवर काढा.आता दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेले आले, लसूण घालून एक मिनिट परतून घ्या. यानंतर कांदा आणि सिमला मिरची घालून काही मिनिटे परतून घ्यावे. आता वर नमूद केलेले सर्व सॉस घाला आणि चांगले मिक्स करा. तुमचे गरमागरम क्रिस्पी एग लॉलीपॉप तयार आहेत. कोथिंबीर टाकून गरमा गरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

BSNL Satellite Phone झाला लाँच! डोंगर, समुद्र, जंगलातही फुल्ल नेटवर्क; पूर, भूकंप, आपत्तीमध्येही संपर्क तुटणार नाही, किंमत फक्त...

Beed: घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

SCROLL FOR NEXT