Food Tips esakal
फूड

Food Tips : एनर्जीचे 'ब्रम्हास्त्र' हवे असेल तर 'असा' करा नाष्टा

हल्लीच्या धावपळीच्या काळात नाष्ट्याला नेमके काय खावे हे कळत नसल्याने या लाइफस्टाइलचा वाइट परिणाम आरोग्यावर होतो.

सकाळ डिजिटल टीम

नाष्टा आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आणि आरोग्यदायी असतो. पण आजकालच्या बिझी लाइफस्टाइलमध्ये नाष्ट्याला काय खावे याचा विचार करायला लोकांना वेळ नसतो. त्यामुळे काही लोक सकाळी जंक फूड खातात आणि त्यामुळे आरोग्याला फार नुकसान पोहचते. त्यामुळे काही सोप्या पॅक्ड प्रोटीन डाएट विषयी सांगणार आहोत ज्यामुळे दिवसभर एनर्जी टिकून राहील.

पीनट बटर टोस्ट

जर सकाळी तुम्हाला हेल्दी ब्रेकफास्ट हवा असेल तर सकाळच्या नाष्ट्यात पीनट बटर टोस्ट चांगला ऑप्शन आहे. ब्रेडच्या दोन स्लाइस घ्या त्यावर चिया सी़ड्स, कापलेले केळं आणि पीनट बटर लावावे. त्यानंतर ब्रेडला ओव्हनमध्ये किंवा तव्यावर टोस्ट करावे.

बेसनाच धीरडं

बेसन प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. म्हणूनच बेसनाचं धीरडं हा एक हेल्दी ब्रेकफास्ट आहे. हे बनवण्यासाठी हिरवी मिर्ची, हळद, काळी मिरे पूड, बारीक चिरलेला कांदा आणि बेसन पिठ घेऊन व्यवस्थित मिक्स करा. नंतर पॅनवर नीट पसरवून दोन्ही बाजूने शेकून घ्या. हेल्दी नाष्टा तयार.

प्रोटीन शेक

प्रोटीन शेक तुम्हाला पूर्ण वेळ एनर्जिएटीक बनवून ठेवतो. यासाठी तुम्हाला १ स्कूप प्रोटीन पावडर, दूध, कापलेली फळं. बदाम आणि पिस्ता घ्यावे. तुम्हाला हवे तर यात चिया सीड्स किंवा आडशी घालू शकतात. दूध आणि प्रोटीन पावडर एकत्र ब्लेंड करून घ्यावे. वरून कापलेली फळ घालावी आणि तुमचे पावर बुस्टर तयार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT