blue colour beer  google
फूड

बिअर... तिही निळ्या रंगाची! काय वापरलं वाचा!

एका फ्रेंच कंपनीने ही बिअर तयार केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या लोक खाद्यपदार्थांवर विविध प्रयोग करत आहेत. तशाप्रकारेच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहेत. हेच बाकी होतं म्हणून की काय आता बिअरवरही (Beer) प्रयोग केला आहे. बिअर चक्क निळ्या रंगात मिळणार आहे. एका फ्रेंच ब्रुअर कंपनीने निळ्या रंगाची बिअर तयार केली आहे. अशी बिअर बनविण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने उगवणारी रंगद्रव्ये असणारी एकपेशीय वनस्पती वापरण्यास सुरूवात केली आहे. 'लाइन' असे या बिअरचे नाव असून ती एकपेशीय वनस्पती लोकप्रिय करू इच्छिणारी एक फर्म आणि क्राफ्ट ब्रुअरी कंपनी यांच्यातील करारानंतर अशाप्रकारे निळ्या रंगाची करण्यात आली आहे. या बिअरची चांगली विक्री होत आहे, असे हॉप्पी अर्बन ब्रूचे कर्मचारी सेबॅस्टिन व्हर्बेकने सांगितले. ही बिअर प्यायला लोक उत्सुक आहेत.

blue colour beer

निळा रंग कसा येतो माहितेय?

उत्तर फ्रान्समधील खोऱ्यांमध्ये स्पिरुलिना ही एकपेशीय वनस्पती (spirulina algae) उगवते. या वनस्पतीला निळा रंग फायकोसायनिन नावाच्या घटकामुळे मिळतो. एटिका स्पिरुलिना या कंपनीने स्पिरूलीना वनस्पतीचा हा घटक बिअर बनविण्याच्या प्रक्रियेदरम्यान वापरल्याने बिअरला निळा रंग आला आहे. बाकी बिअरच्या चवीत फारसा बदल झालेला नाही. ती करण्यासाठी अनेक चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर अशाप्रकारे बिअर तयार केली असून ती आता लोकांना आवडत असल्याचे कंपनीचे झेवियर डेलानॉय म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Attack: सोलापूर जिल्ह्यात पुन्हा आला वाघ! 'धामणगावतील शेतकऱ्याच्या गायीची शिकार'; गायीचा हंबरडा अन्..

Chakan News : देवीचा भुत्या म्हणून सेवा करताना मुलांना दिली उच्च शिक्षणाची दिशा; दिवटीच्या प्रकाशातील शिक्षणाने उजळले भविष्य

Aadhaar PAN Link : मोठी बातमी ! 'या' लोकांचे आधार अन् पॅन कार्ड १ जानेवारी पासून डिअ‍ॅक्टिवेट होणार, आजच करा 'हे' काम

Malshiras Crime : पहिल्या प्रियकराने काढला प्रेयसीच्या पतीचा काटा; राजेवाडीत तरुणाचा कोयत्याने वार करून खून

Mumbai : निवडणुकीआधी ठाकरेंना धक्का, तेजस्वी घोसाळकर भाजप प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT