Gudi Padwa Recipe esakal
फूड

Gudi Padwa Recipe : पाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत करताय? जाणून घ्या रेसिपी !

गुढीपाडवा म्हटले की डोळ्यापुढे श्रीखंड येतेच

सकाळ डिजिटल टीम

Gudi Padwa Recipe : गुढीपाडवा म्हटले की डोळ्यापुढे श्रीखंड येतेच. एक तर उन्हाळ्याला झालेली सुरुवात, उन्हाची काहिली वाढलेली. अशा वेळेस जीभेवर विरघळ्णारे आंबट गोड श्रीखंड आणि पुरी हा तर सगळ्या घराचा आवडता बेत. (Gudi Padwa 2023)

श्रीखंड हा दुधापासून बनणारा खास गोड खाद्यपदार्थ आहे. अतिशय साध्या रूपात श्रीखंड म्हणजे चक्का आणि साखरेचे मिश्रण म्हणता येईल. या मिश्रणात अधिक चवीसाठी सामान्यत: बदाम-पिस्ता, काजू, केशर, वेलदोडा, आंब्याचा रस इ. पदार्थ मिसळले जातात. महाराष्ट्रामधील खाद्यसंस्कृतीमध्ये श्रीखंड या पदार्थाला जास्त महत्त्व आहे.

कोणतेही शुभ कार्य असले की, घरामध्ये श्रीखंड-पुरीचा बेत तयार केला जातो. त्यातल्या त्यात घरगुती श्रीखंडाची बात न्यारी! पाडव्याला तर हमखास श्रीखंड पुरीचा बेत असतोच. कसे केले जाते हे श्रीखंड.

श्रीखंड बनविण्याची कृती

साहित्य:

ताजे दही - 1 किलो,

पिठी साखर -1 किलो

चवीनुसार गोड कमी हवे असेल तर पाऊण किलो पिठीसाखर ,

केशर काडी,

वेलची पूड -अर्धा चमचा,

थोडी जायफळ पूड - अर्धा चमचा,

चारोळी

काजू, बदाम चारोळी आवडीप्रमाणे

कृती : ताजे घट्ट दुधाचे दही सकाळी लावले की रात्री पातळ कापडात बांधून वरती लटकवावे . सकाळी त्यातील पाणी पूर्णपणे निघालेला चक्का मिळतो. त्यात पिठीसाखर घालावी नंतर चक्का फेटून घ्यावा.

खूप वेळ लागतो हे मिश्रण चांगले एकजीव व्हायला किंवा पुरण पात्रा मध्ये किंवा चाळणीवर फिरवूनही श्रीखंड तयार करता येते. तयार मिश्रणात केशर घोळून मिसळावा.

आमरस मिळवला असता या पदार्थास आम्रखंड असे म्हणतात. आता यात वेलची, जायफळ पूड घालून ढवळावे नंतर ड्रायफ्रूट्‌स काप पसरावेत. श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवून गार होऊ द्यावे.

श्रीखंड डावेने वाढता येईल इतके घट्ट असावे. श्रीखंड शक्‍यतो आदल्या दिवशी करावे म्हणजे मुरल्यावर अधिक रुचकर लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : आदिवासी आक्रमक- पोलिस स्टेशनवर दगडफेक

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Sharad Pawar : पूरग्रस्तांसाठीच्या नुकसानभरपाईचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे; शरद पवार यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT