Meal
Meal esakal
फूड

मेसच्या जेवणाला कंटाळले आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे

सकाळ डिजिटल टीम

बॅचलर (Bachelor) आहात? शिक्षण (Education), नोकरीच्या निमीत्ताने कुटूंबापासून राहात आहात? तर तुम्ही नक्कीच मेस किंवा हॉटेलच्या जेवणाला कंटाळला असालच, आणि जेवताना प्रत्येकघासाला आईच्या हातच्या जेवणाची तुम्हाला आठवण येतच असेल. असही सतत मसालेदार आणि जंकफूड खाल्ल्याने सतत ॲसिडीटीचा (Acidity) त्रासही जाणवतो. मग अशा वेळी करायचे काय? कारण मुळात पुर्ण स्वयंपाक बनवता येत नाही आणि येत असेल तरी बनवायला वेळ नाही. मग अशा वेळी या सोप्या आणि पटकन बनणाऱ्या पदार्थांमुळे तुम्हाला पौष्टीक, सकस सोबतच घरच खाल्ल्याच समाधान मिळेल. या रेसिपी (Recipe) ईतक्या सोप्या आहेत की, तुम्ही त्यांना बनवून खाण्याचा विचार केला की पुढच्या अर्ध्या तासात तुम्ही ते बनवून त्यानंतर खाऊन ढेकर दिलेला असेल...

तर बघुयात कोणत्या आहेत या रेसिपीज्....

डोसा, उत्तपा यांची नावे जरी ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं. पण यांना बॅचलर व्यक्तीने घरी बनवणे अवघडच. म्हणजे पुन्हा यांना खाण्यासाठी घराबाहेरच पडाव लागेल. पण आज आपण या दोन्ही पदार्थांना पर्यायी मात्र चविला यांच्यापेक्षाही जबरदस्त सोबतच पौष्टीक असे पदार्थ पाहणार आहोत. यांना डोसा, उत्तपा, चिला किंवा थालीपीठ यापैकी काहीही म्हणा. पण घरच्याघरीच तुमच्या पोटाची भुक भागवणारे व तुमच्या हातचे बनलेले पदार्थ असतील.
आपल्याला सर्वांनाच माहीती आहे की, ज्वारी, बाजरी, तांदूळ, शिंगाड्याचं पिठ हे अत्यंत पौष्टीक आहे. सोबतच सर्व डाळी, भगर यांपासून १० मिनीटांत बनणाऱ्या आणि घरच्या घरीच एका बॅचलरची भुक भागवणाऱ्या पदार्थांची रेसीपी आपण बघूयात.
सर्वप्रथम आपल्या घरात ज्वारी, बाजरी, तांदूळ, नागली, सर्व डाळींचे एकत्र असे पीठ, सोबतच भगर, शिंगाड्याचे पीठ घरात आणून ठेवा.(हे सर्व बाजारात सहज उपलब्ध असतं) त्यानंतर आपण कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि चहाला आलं तर घरात आणतोच.
तर सर्व प्रथम तुम्हाला यापैकी कुठल्या पिठाचा पदार्थ बनवायचा आहे ते ठरवून घ्या. त्यानंतर त्या पिठात चविनुसार मिठ, आलं- लसुण- मिरची यांची पेस्ट घाला व त्यात पाणी घालून ५ मिनीटे त्याला भिजू द्या. तोपर्यंत कांदा- टोमॅटो चिरून घ्या सोबत कोथिंबीर असेल तर सोन्याहून पिवळ!
त्यानंतर नॉन-स्टीक पॅनवर अगदी थेंबभर तेल घालून त्यावर आपण भिजवलेलं मिश्रण डोसा किंवा उत्तप्प्याप्रमाणे घाला. त्यानंतर त्या मिश्रणावर चिरलेला कांदा- टोमॅटो, हिरवी मिर्ची, कोथिंबीर घालून चांगल शेकून घ्या. अवघ्या २ ते ३ मिनीटांत तुम्ही बनविलेला हा पदार्थ तुमच्या ताटात असेल. सोबतीला मग दही, टोमॅटो सॉस, किंवा आईने घरून पाठवलेली शेंगदाण्याची चटणी घेतली की, पोट भरलंच म्हणायचं.
अवघ्या २ ते ३ मिनीटांत तुम्ही बनविलेला हा पदार्थ तुमच्या ताटात असेल. सोबतीला मग दही, टोमॅटो सॉस, किंवा आईने घरून पाठवलेली शेंगदाण्याची चटणी घेतली की, पोट भरलंच म्हणायचं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT