Healthy Recipe esakal
फूड

Healthy Recipe : आरबट-चरबट खाण्यापेक्षा दिवसाची सुरूवात हेल्दी पालक इडलीने करा!

नाश्त्यामध्ये साऊथ इंडियन फूड इडलीही खूप पसंत केली जाते

Pooja Karande-Kadam

Healthy Recipe : मुग डाळ पालक इडली सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम फूड डिश ठरू शकते. सकाळचा नाश्ता चविष्ट तसेच आरोग्यदायी असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. साऊथ इंडियन फूड इडली मोठ्या प्रमाणात पूर्ण करते. त्याचबरोबर पालकासोबत इडली बनवली तर त्याचे पोषणमूल्य लक्षणीय वाढते.

नाश्त्यामध्ये साऊथ इंडियन फूड इडलीही खूप पसंत केली जाते. जर तुम्हालाही पालक इडलीची रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्ही आमच्या सांगितलेल्या रेसिपीच्या मदतीने काही मिनिटांत तयार करू शकता.(Healthy Recipe : moong dal palak idli recipe in Marathi)

पालक, गाजर, दहीचा वापर पालक इडली बनवण्यासाठीही वापर केला जातो. पालकाची इडली मुलांच्या टिफिनमध्येही ठेवता येते. मूग डाळ पालक इडली बनवण्याची एक अतिशय सोपी रेसिपी जाणून घेऊया.

मूग डाळ पालक इडली बनवण्यासाठी साहित्य

  1. - १ वाटी पालक चिरलेला - २ कप

  2. - १ वाटी मूग डाळ

  3. - गाजर किसलेले - १/३ कप दही - १ वाटी

  4. राई - १ टीस्पून उडीद डाळ - १ टीस्पून

  5. चणाडाळ - १ टीस्पून

  6. काजू - १ टीस्पून

  7. आले चिरलेले - १ टीस्पून

  8. हिरवी मिरची - २

  9. जिरे - १ टीस्पून

  10. बेकिंग सोडा - १/४ टीस्पून

  11. देशी तूप - १ टीस्पून

  12. मीठ - १ टीस्पून मीठ - चवीनुसार (Palak Idli Recipe)

पालक इडली बनवण्याची कृती

सर्वप्रथम पालक धुवून नीट स्वच्छ करा. यानंतर पालकाचे देठ फोडून बारीक चिरून घ्यावेत. आता एका कढईत अर्धा चमचा तूप घालून मध्यम आचेवर गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात मूग डाळ, उडीद डाळ, चणाडाळ आणि काजू घालून तिन्ही साहित्य नीट परतून घ्यावे.

हे साहित्य चांगले भाजले की त्यात किसलेले गाजर घालून मिक्स करून आणखी २ मिनिटे परतून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणात १ कप रवा घालून चांगले मिक्स करून २-३ मिनिटे परतून घ्यावे. यानंतर हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून त्यात दही घालून चांगले मिक्स करावे. यानंतर हे मिश्रण १० मिनिटे असेच ठेवावे.(Marathi Recipes)

आता कढईत पुन्हा अर्धा चमचा तूप घालून गरम करा. त्यात जिरे, आले, हिरवी मिरची घालून ३० सेकंद परतून घ्या. नंतर त्यात पालक घालून चांगले मिक्स करून परतून घ्यावे. यानंतर गॅस बंद करा.

मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून एक तृतीयांश कप पाणी मिसळून बारीक करून पेस्ट तयार करावी. आता रवाच्या मिश्रणात ही गुळगुळीत पेस्ट घालून मिक्स करा.

चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण चांगले मिसळल्यानंतर त्यात बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घालावे. आता इडलीचे भांडे घ्या आणि त्यात तूप घालून तेल घाला. त्यात इडलीचे मिश्रण टाकून झाकण ठेवून इडली १५ मिनिटे उच्च आचेवर शिजू द्या. (South Indian Food)

इडली तयार झाल्यावर एका भांड्यात काढा. त्याचप्रमाणे सर्व पालक इडली तयार करून नारळाची चटणी किंवा हिरवी चटणी घालून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

Amol Khatal Attack : शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला; संगमनेरमध्ये तणाव!

SCROLL FOR NEXT