AALIV LADOO GOOGLE
फूड

थंडीत अळीवाचे लाडू खाताय! ऋजुता दिवेकर सांगतेय फायदे

थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणूनही हे लाडू केले जातात

सकाळ डिजिटल टीम

थंडीच्या (Winter) दिवसात जे पदार्थ (Food) केले जातात, त्यात आळीवाचे लाडू (Aaliv Ladoo) प्रामुख्याने केले जातात. अनेक घरात हे लाडू अगदी आवडीने केले जातात. बाळंतिणीला दूध चांगले यावे म्हणून तिला हे लाडू हमखास दिले जातात. थंडी पासून संरक्षण मिळावे म्हणूनही हे लाडू केले जातात. लाडवातील गूळ, नारळ या पदार्थांमुळे ते पौष्टीकही असतात.

हे लाडू खाण्याचे शरीरासाठी काही फायदेही आहेत. याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून माहिती दिली आहे.ती म्हणते हे लाडू खाताना आपण आपल्या हातांनी चविष्ट लाडू केल्याचे समाधान जास्त असते. हे लाडू खाण्याचे ४ फायदे तिने सांगितले आहेत

१) वयात येणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींसाठी हे लाडू आवश्यक आहेत. त्यांना लोहाची कमतरता भासू नये यासाठी ते आवश्यक आहेतच. पण, एचबी पातळी व्यवस्थित राहून ते यौवनात सहज संक्रमण करू शकतील.

२) प्रत्येक किशोरवयीन मुला-मुलींसाठी हे लाडू आवश्यक आहेत. त्यातील फोलेटमुळे तुमचे ब्रेकअप झाले तरीही तुमचे ब्रेकआउट होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

३) जे लोक अपत्याचा विचार करत आहेत त्या कपल्ससाठी हे अत्यंत फायद्याचे आहेत. ते प्रजननासाठी सर्वोत्तम आहेत.

४) रजोनिवृत्तीनंतर प्रत्येकीसाठी लाडवाचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यातील सल्फोराफेन त्वचेवरील रंगद्रव्य रोखण्यास मदत करते.

aaliv ladoo

लाडवाची रेसिपी

अळीवाचे लाडू करताना त्यात नारळाचे प्रमाण योग्य असेल याची काळजी घ्यावी. नारळाचा चव कमी असेल तर लाडू चांगलाही लागत नाही आणि वळलाही जात नाही.

अळीव १०० ग्रॅम

नारळाचे पाणी १ वाटी

नारळाचा चव- ३ वाट्या

गूळ – एक वाटी

कृती- एका भांड्यात नारळाच्या पाण्यात अळीव भिजवावेत. रात्रभर किंवा दुपारभर भिजवून ठेवा. त्यानंतर कढईत नारळाचा चव, गुळ, आणि भिजवलेले अळीव घाला. १५ ते २० मिनिटे बारीक गॅसवर हे मिश्रण एकजीव होऊ द्या. हे मिश्रण खाली उतरवून गार करा. गार झाल्यावर त्याचे लाडू वळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT