Bread Cutlet Recipe esakal
फूड

Bread Cutlet Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट ब्रेड कटलेट, एकदम सोपी आहे रेसिपी

Bread Cutlet Recipe : ब्रेड कटलेट हा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवता येणारा सोपा आणि चविष्ट पर्याय आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Bread Cutlet Recipe : सकाळचा गरमागरम नाश्ता सगळ्यांनाच हवा असतो. हा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी हवा, अशी इच्छा सगळ्यांची असते. मात्र, अनेकदा सकाळच्या गडबडीमध्ये नाश्ता तयार करण्यास उशीर होतो. या गडबडीमध्ये बनवायला सोपा आणि खायला चविष्ट असा पदार्थ करण्यावर अनेकांचा भर असतो.

ब्रेड कटलेट हा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवता येणारा सोपा आणि चविष्ट पर्याय आहे. हा चवीला स्वादिष्ट असणारा पदार्थ बनवायला अतिशय सोपा आहे. शिवाय, ही रेसिपी बनवायला तुम्हाला जास्त साहित्याची गरज पडणार नाही. कमी साहित्यामध्ये झटपट होणारा आणि खायला चविष्ट असणारा हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला नक्की ट्राय करा. चला तर मग जाणून घेऊयात, ब्रेड कटलेटची सोपी रेसिपी.

ब्रेड कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • उकडलेला बटाटा – २

  • ब्रेड स्लाईस – ४

  • लाल तिखट – १ चमचा

  • कॉर्न फ्लोअर – १ चमचा

  • बारीक चिरलेला कांदा – १

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची – ३-४

  • आलं-लसणाची पेस्ट – १ चमचा

  • उकडलेले कॉर्न – १ वाटी

  • लिंबाचा रस

  • चाट मसाला – अर्धा चमचा

  • चवीनुसार मीठ

  • तेल

ब्रेड कटलेट रेसिपी बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • ब्रेड कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी ब्रेड स्लाईसच्या कडा कापून घ्या.

  • त्यानंतर, ब्रेड स्लाईसचे बारीक तुकडे करून ते एका बाऊलमध्ये ठेवा.

  • आता या ब्रेडच्या तुकड्यांमध्ये उकडलेला बटाटा स्मॅश करून घाला.

  • हे मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.

  • आता या मिश्रणात, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, कॉर्न, आणि आल्याची पेस्ट घालून सर्वकाही चांगले मिक्स करून घ्या.

  • त्यानंतर, या मिश्रणात लाल तिखट, चाट मसाला, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

  • आता तळहातावर तेल लावून तयार मिश्रणापासून गोल आकारात किंवा तुम्हाला हव्या त्या आकारात ब्रेड कटलेट बनवा.

  • दुसऱ्या बाजूला कढईत तेल गरम करायला ठेवा.

  • या गरम तेलात ब्रेड कटलेट घाला आणि ते दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

  • तुमचे स्वादिष्ट ब्रेड कटलेट तयार आहेत.

  • टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत हे गरमागरम ब्रेड कटलेट सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad: टॉवेल, बनियनवर आले अन् कँन्टीन कर्मचाऱ्याला धुतलं... आमदार निवासात राडा! संजय गायकवाडांचा व्हिडिओ व्हायरल

Asha Workers: सातारा जिल्ह्यातील आशा सेविक आक्रमक! 'प्रलंबित मागण्‍यांकडे शासनाचे लक्ष वेधले'; 'झेडपी'समोर आंदोलन

Kolhapur Students : कोल्हापूरची पोरं राष्ट्रीय सर्व्हेत हुशार‘,एनसीईआरटी’कडून मूल्यांकन

Pune Market Yard : बाजार समिती रडारवर; विशेष समितीकडून तब्बल ५१ मुद्द्यांवर छाननी

Satara News : राज्यातील गटसचिवांचे आंदोलन स्थगित, पोलिसांची मध्यस्थी; पुण्यात आज बैठकीचे आश्वासन

SCROLL FOR NEXT