How to make PM Modi's Favorite Jhalmuri Recipe | Bengal’s Famous Street Food That’s Making Headlines After Elections

 

sakal

फूड

PM Modi’s Favorite Jhalmuri: मोदींना आवडलेली झालमुरी कशी बनते ? बंगालच्या निवडणुकीत गाजलेल्या पदार्थाची रेसिपी लिहून घ्या, Viral

PM Modi’s Favorite Jhalmuri Recipe: मोदींना आवडलेली आणि बंगालमध्ये गाजलेली चटपटीत झालमुरी घरी कशी बनवायची ते जाणून घ्या.

Anushka Tapshalkar

How to Make Jhalmuri: झालमुरी हा कोलकात्यातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड प्रकार असून तो कुरकुरीत, चटपटीत आणि झटपट तयार होणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या दौऱ्यात स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना या लोकप्रिय झालमुरीचीही चव चाखली आणि तिथल्या खाद्यसंस्कृतीचे कौतुक केले. दरम्यान, आजच्या बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि निकालानंतर मोदींची ही भेट, तिथला राजकीय विजय आणि विशेषतः हा पदार्थ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चला तर मग त्यानिमित्ताने ही व्हायरल होत असलेली डिश कशी बनवायची ते पाहूया.

साहित्य

  • मुरमुरे (Puffed Rice / Kurmura)

  • मीठ

  • उकडलेले बटाटे (चिरून)

  • टोमॅटो (बारीक चिरलेले)

  • कांदा (बारीक चिरलेला)

  • काकडी (बारीक चिरलेली)

  • हिरवी मिरची (बारीक चिरलेली)

  • कोथिंबीर (चिरलेली)

  • शेंगदाणे (भाजलेले)

  • लाल तिखट

  • धणे पावडर

  • फरसाण

  • शेव

  • लिंबू

कृती

- सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात मुरमुरे घ्या.

- त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी आणि उकडलेले बटाटे घाला.

- आता खल-बत्यात हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ठेचून ठेचा बनवून घ्या.

- आता हा ठेचा मुरमुरे आणि बाकी साहित्य असलेल्या मोठ्या भांड्यात घाला.

- नंतर कढईत भाजलेले शेंगदाणे घ्या आणि त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि धणे पावडर घाला.

- कढईत हे थोड्यावेळ भाजून घ्या आणि मिश्रणात घाला.

- त्यात थोडीशी कोथिंबीर टाका आणि सगळे नीट मिक्स करा.

- शेवटी कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी फरसाण आणि शेव घाला.

- वरून थोडा लिंबू पिळून सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र करा.

- लगेच सर्व्ह करा, नाहीतर मुरमुरे नरम होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Nawale: निर्मला नवले यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी; जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवानंतरही संघटनेत स्थान

Uruli Kanchan Garbage: उरुळी कांचनमधील पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेजच्या प्रवेशद्वारावर कचराकुंड्यांचे साम्राज्य; विद्यार्थ्यांचे ‘कचरा स्वागत’

Marathi News Live Updates : कपिल सिबल यांनी निवडणूक आयोगाकडून झालेली एक गंभीर चूक निदर्शनास आणून दिली - अनिल देसाई

Pune illegal hill cutting issue: पुण्यात टेकडीफोडीला लगाम घाला; बेकायदेशीर बांधकामे थांबवा, परवानग्या रद्द करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश

Pune Civic Tenders: महापालिकेच्या रखडलेल्या शेकडो कोटींच्या निविदा दोन दिवसांत मार्गी लावा; राजकीय दबावाला बळी न पडण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश

SCROLL FOR NEXT