If you dont like fried foods try baked snacks 
फूड

तळलेले पदार्थ खायला आवडत नाही? तर ट्राय करा ‘बेक्ड स्नॅक्स’; तुम्हीही पडाल प्रेमात

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सकाळचा नाश्ता, दुपारचा नाश्ता, सायंकाळचा नाश्ता... नाश्ता करण्याची वेळ नाही. घर असो किंवा बाहेर नाश्ता करणे प्रत्येकाळा आवडते. नाश्ता करण्यासाठी शौकीन वेगवेगळे कारणे शोधत असतात. समोसा, भजे आदीपदार्थ चहाबरोबर खाण्याची मजा काही वेगळीच आहे. कुरकुरे आणि फ्राय केलेले पदार्थ चहासोबर घेण्याचा वेगळाच आनंद...

चटपटं आणि तळलेले पदार्थ शरीरासाठी चांगले नसतात असे म्हणतात. यामुळे वजन वाढते असेही म्हटले जाते. यामुळे मुली अशे पदार्थ शक्यतो खाणे टाळतात. मुलींना आपल्या शरीराची फार काळजी असते. त्यामुळे त्या गोळ पदार्थ खाणे देखील टाळत असते. मात्र, मुलांच या उलट असते. ते अशा पदार्थांचा आनंद घेतात.

काही लोक प्रवासाला जाताना सोबत चकली, कचोरी, समोसा असे पदार्थ घेऊन जात असतात. बाहेर जाताना अशा पदार्थांचे सेवण करणे मजेशीर असते. मित्र-मैत्रिणी सोबत असल्यास याचा आनंद अधिकच वाढून जातो. मात्र, काही लोक तळलेले स्नॅक्स खाणे टाळतात. अशा लोकांसाठी आम्ही काही भाजलेल्या स्नॅक रेसिपी घेऊन आलो आहे. बेकिंग स्नॅक्स तळलेल्या स्नॅक्स पेक्षा आरोग्यादासाठी चांगले असते. चला तर पाहुया कोणते आहेत हे स्नॅक्स...

भाजलेले मशरूम-मसूर

ही तोंडात पाणी आणणारी स्नॅकची रेसिपी आहे. मसूर दाळ आणि मशरूमपासून तयार होणारी ही चागंली आणि सर्वांना पसंद येणारी डीश आहे. याला तेलात तळले जात नाही तर फ्राय केले जाते.

बेक्ड चीज समोसा

आपल्यापैकी अनेकांना समोसा खायला आवडतो. काही जण तर समोस्यांचे प्रेमी असतात. बाहेर समोसा खाण्यासाठी नागरिक गर्दी करीत असतात. बेक्ड केलेला समोसा खाल्ला का, असा प्रश्न केला तर तुम्हा नक्की नाही म्हणाल. सोबतच खाण्याची इच्छाही व्यक्त कराल. बेक्ड समोस्याची एक वेगळी चव असते. याचा आनंद आपण चहा पिताना आणि रात्रीच्या जेवणातही घेऊ शकता.

बेक्ड अमंड कोफ्ता

हे एक अतिशय चवदार स्नॅक आहे. याचा आपण आपल्या कुटुंबासह जेवण करतानाही आनंद घेऊ शकता. हे चांगल असून, आलू, बदाम आणि अंड्याचा वापर करून तयार केले जाते.

भाजलेली रागी चकली

आपल्याकडे दिवाळीला घरोघरी चकली केली जाते. कुरकुरी चकली सर्वांना आवडते. यामुळे याला बाजारात मोठी मागणी असते. आपल्याकडे चकली तेलात तळून केली जाते. ही चकली खायला चांगली असली तरी आरोग्यासाठी हानिकारक समजली जाते. त्यामुळे बेक्ड चकली याला चांगला पर्याय ठरू शकते. यासाठी नाचनीचे पीठ वापरले जाते. हा एक खारट स्नॅक आहे.

बेक केलेले कॅरेट फ्राय

हा पदार्थ अतिशय चांगला आहे. आणि हा आलूपासून तयार केला जातो. मुलींना आपल्या शरीराची मोठी काळजी असते. ते तळलेले पदार्थ खान टाळतात. त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. आपल्या आरोग्याबद्दल काळजी घेत असाल तर आपल्याला हा आरोग्यदायी रेसिपी आवडेल. यामध्ये गाजर लांबीच्या दिशेने कापले जातात आणि ऑलिव्ह ऑईलने शिजवलेले आणि बेक केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT