Instant Bread Receipe  esakal
फूड

Instant Bread Receipe : ब्रेड उरला आहे? मग बनवा खास शाही तुकडा घरच्या घरी फक्त २० मिनिटांत

सध्या सोशल मीडियावर एक रेसिपी खूप जास्त चालते आहे

सकाळ डिजिटल टीम

Instant Bread Receipe : सध्या सोशल मीडियावर एक रेसिपी खूप जास्त चालते आहे; पण ह्याच नाव अनेकांना माहितीच नाहीये; ही रेसिपी आहे शाही तुकडा; रबडी सारखा दिसणारा आणि तसाच लागणारा हा ब्रेडने बनवलेला एक खूप टेस्टी पदार्थ आहे.

तुम्हाला बहुदा वाचून आश्चर्य वाटेल पण कित्येक लोकांच्या लग्नात डेझर्ट म्हणून हा पदार्थ ठेवला जातो. पण हा पदार्थ तुम्ही घरी उरलेल्या ब्रेडच्या स्लाइस ने देखील करू शकतो.

शाही तुकडा बनवण्याची रेसिपी...

साहित्य

ब्रेड – ४ स्लाइस

दूध – एक लिटर

पनीर – १०० ग्रॅम

कन्डेन्स मिल्क – १०० ग्रॅम

साखर – १०० ग्रॅम

किसमिस – २५ ग्रॅम

बदाम – २५ ग्रॅम

तूप – ५० ग्रॅम

कृती

१. प्रथम ब्रेड त्रिकोणी आकारात कापून घ्या.

२. कापलेले ब्रेड तुपात छान फ्राय करून घ्या.

३. पॅनमध्ये दूध, कन्डेन्स मिल्क, साखर एकत्र करून गॅसवर ठेवा.

४. दूध घट्ट झाल्यावर त्यात थोडे पनीर किसून घाला.

५. तयार झालेली दुधाची रबडी थंड करायला ठेवा.

६. एका डिशमध्ये तळलेले ब्रेड सजवून त्यावर थंड रबडी घाला आणि मग बदाम, किसमिस आणि पिस्ताने डिश सजवून घ्या.

शाही तुकडा तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT