Food Tips for Summer esakal
फूड

Food Tips for Summer : उन्हामुळे चिडचिड होते? मग ‘या’ पदार्थांचा करा आपल्या आहारात समावेश

आता हिवाळ्याचे दिवस संपून हळूहळू उन्हाळा सुरु झाला आहे. अर्थात उन्हाळा कोणालाच नको असतो

सकाळ डिजिटल टीम

Food Tips for Summer : आता हिवाळ्याचे दिवस संपून हळूहळू उन्हाळा सुरु झाला आहे. अर्थात उन्हाळा कोणालाच नको असतो, प्रखर ऊन, त्यामुळे येणारा घाम, चिकटपणा आणि यासगळ्यात खूप चिडचिड होते. अगदी AC किंवा कुलरमध्ये बसलो तरी उन्हाच्या झळा बसतातच, शिवाय या हवामानाचा थेट परिणाम आपल्या मूडवर होतो.

वारंवार घाम येण्यामुळे किंवा सतत एसीचे तापमान सेट करतांना आपली अनेकदा चिडचिड होते. त्यामुळे अशावेळी बाहेरच्या हवेवर अवलंबून न राहता आपल्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे आपला मूड सुधारु शकतो. ते कसं हे जाणून घ्या.

मूड स्विंग कसे होतात?

खराब मूड हे तुमच्या शरीरात सेरोटोनिन नावाच्या पदार्थाची कमतरता असल्याचे लक्षण आहे. हा एक प्रकारचा न्यूरोट्रांसमीटर आहे, जो मूड स्विंग्स थांबवतो. हा घटक आपल्या शरीराचे संतुलन स्थिर राहण्यासाठी अन्नपदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असणे आवश्यक आहे. ज्या पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन चांगल्या प्रमाणात असते ते खाल्ल्याने सेरोटोनिनचे उत्पादन वाढते आणि आपला मूडही चांगला राहतो. परिणामी आपण शांत आणि आनंदी राहू शकता.

मूड स्विंग टाळण्यासाठी काय खावे?

- केळी

केळामध्ये ट्रिप्टोफॅन चांगल्या प्रमाणात असतं त्यामुळे केळी खाल्ल्याने मूडही चांगला राहतो आणि झोपही चांगली येते.

- बदाम

बदामामध्ये फोलेट आणि मॅग्नेशियम असतात, मॅग्नेशियम सेरोटोनिनचे उत्पादन देखील वाढवते. याशिवाय बदाम हा व्हिटॅमिन B2 आणि E चे चांगले स्त्रोत आहे, जे प्रत्येक ऋतूमध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास मदत करते.

- अननस

अननसात ट्रिप्टोफॅन असते. याशिवाय ब्रोमेलेन नावाचे प्रोटीन देखील असते.

या वरील पदार्थांचे सेवन करतांना ते योग्य आणि नियंत्रित प्रमाणात करणं लक्षात ठेवायला हवं यामुळे मूड स्विंग टाळणे जास्त सोपे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT