Kartoli Sabji Recipe in Marathi
Kartoli Sabji Recipe in Marathi Esakal
फूड

Ranbhaji: करटोलीची भाजी कशी करतात?

दिपाली सुसर

पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. टाकळा, करटोली,कोहळू, लोथ, अशा अनेक भाज्यांचा आजकाल आपल्या आहारातून समावेश कमी होत चालला आहे. परंतू चवीला हटके आणि आरोग्यादायी आहेत. पावसाळ्यातील रानभाजीपैकी करटोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते. त्यामुळे या भाजीचा यंदा नक्की स्वाद चाखा.

करटोल्याच्या भाजी खाण्याचे फायदे

1) करटोला हे लहान वांग्यापेक्षा लहान आकाराचे फळ आहे. यामध्ये प्रोटीन, आयर्न घटक मोठ्या प्रमाणात असतात.

2) सुमारे 100 ग्रॅम करटोल्यांमध्ये 17 कॅलरीज आढळतात.

3) करटोलीमध्ये फायबर आणि अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ही भाजी पचायला हलकी असते.

4) पावसाळ्याच्या दिवसात इंफेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते. शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी करटोल्यातील phytochemicals घटक मदत करतात. सोबतच कॅन्सर, हृद्यविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते.

5) मधुमेहींसाठीदेखील करटोली फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.वातावरणात बदल झाल्याने कफ, सर्दी, खोकला, इतर अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

आता बघू या बहुगुणी करटोलीची भाजी नेमकी कशी करतात ?

साहित्य:

1) एक पाव करटोली

2) एक बारीक चिरलेले टोमॅटो

3) एक बारीक चिरलेला कांदा

4) हळद, तिखट, मीठ, धना पावडर

5) शेंगदाणा कूट

6) तेल

कृती:

सर्वप्रथम बाजारातून आणलेली हिरवीगार करटोली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. धुतलेली करटोलीच्या कारल्याप्रमाणे गोल गोल चकत्यांमध्ये कापून घ्यावी.

नंतर कढईत थोडसं तेल टाकुन कांदा, टॉमेटोची फोडणी देऊन त्यात करटोली परतून वाफलुन घ्यावी.

वाफलुन घेतलेले करटोली एका भांडयात काढुन नंतर त्या कढईत पुन्हा तेल टाकुन तिखट,हळद, मसाला, धने-जिर्‍याची पूड, मीठ, शेंगदाण्याचा कूट टाकुन कलसुन घ्यावे आणि नंतर वाफलुन घेतलेले करटोली त्यात सोडून द्यावी ,पाच मिनिटे गॅस बंद करावा. अशा रितीने आपली करटोलीची भाजी तयार झाली आहे.तुम्ही ही भाजी भाकरी,पोळी सोबत खाऊ शकता.

टिप: करटोलीच्या वरचे आवरण काढू नका. कारण त्यामध्येच अधिक पोषकघटक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT