फूड

झटपट करा रव्याची कुरडई ; जाणून घ्या कृती

आता कोणत्याही ऋतुमध्ये सहज करता येईल कुरडई

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळा सुरु झाला की प्रत्येक घरी उन्हाळ्याची काम सुरु होतात. घरातील स्त्रिया पापड, कुरडई, लोणची करण्यात बिझी होऊन जातात. विशेष म्हणजे घरातील इतर कामं सांभाळून या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरतच असते. मात्र, तरीदेखील या गृहिणी हसतमुखाने ही सगळं काम करतात. विशेष म्हणजे उन्हाळ्यात केलेले कुरड्या, पापड हिवाळा येईपर्यंत लगेच संपूनही जातात. त्यामुळेच आज आपण कुरड्यांच अशी एक रेसिपी पाहणार आहोत जी कोणत्याही ऋतुमध्ये सहज करता येते. (kitchen tips instant rava kurdai)

साहित्य -

बारीक रवा - १ वाटी

पाणी - आवश्यकतेनुसार

मीठ - चवीनुसार

सोडा - चिमुटभर

कृती -

प्रथम रवा नीट निवडून घ्या आणि दिवसभर पाण्यात भिजवून ठेवा. ( रव्याच्या वर पाणी येईल इतकं पाणी घ्या.) दुसऱ्या दिवशी रव्याच्या वरचं पाणी काढून टाका व रवा छान फेटून घ्या. आता दुसऱ्या पातेल्यात एक वाटी पाणी घेऊन ते गरम करायला ठेवा. या पाण्यात अंदाजे मीठ व सोडा घाला आणि छान उकळी आणा. पाण्याला एक उकळी आल्यानंतर घोटलेला रवा या पाण्यात टाका व मिक्स करुन घ्या. आता पातेल्यावर झाकण ठेऊन रव्याला एक वाफ काढा. जर रवा जास्तच चिकट वाटत असेल तर अंदाजे हळूहळू पाणी मिक्स करा. अशा प्रकारे रव्याचा चीक तयार होतो.त्यानंतर तुमच्या आवडीनुसार, या चिकाच्या कुरड्या करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Bans China Cars : इस्त्रायलमध्ये 'मेड इन चायना' वाहनांवर बंदी, ७०० कार जप्त; सरकारचा 'या' कारणामुळे मोठा निर्णय

अग्रलेख : चला उभारा शुभ्र शिडे ती..

जुबेर हंगरगेकरला आज पुन्हा न्यायालयात नेले जाणार! ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘ATS’ची नोटीस, कुंभारीजवळील शाळेतील कार्यक्रमाचे तेच होते आयोजक

फास्ट फूड ते फॅटी लिव्हर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT