Appe Breakfast Recipe esakal
फूड

Appe Breakfast Recipe: रात्रीचा भात उरलाय? हरकत नाही, ट्राय करा हे चविष्ट आप्पे...

गंमत म्हणजे कोणला कळणार सुद्धा नाही की हे भाताचे आप्पे आहे

सकाळ डिजिटल टीम

रोज सकाळी उठून ब्रेकफास्टला काय करायचं असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोरच असतो. शिवाय अनेकदा रात्रीचं काहीतरी उरतच आणि ते टाकून द्यावस वाटत नाही. भात उरला की त्याला आई सऱ्हास फोडणी देऊन द्यायची पण या भाताचा अजून एक पदार्थ करता येतो हे तुम्हाला माहिती आहे का?

या भातापासून आपण चविष्ट आपे बनवू शकतात, गंमत म्हणजे कोणला कळणार सुद्धा नाही की हे भाताचे आप्पे आहे आणि छुपारुस्तमपणा करुन केलेली ही डिश घरात सगळ्यांचीच आवडती बनेल. बघूया, रेसिपी.

साहित्य - 

१. शिळा भात - १ वाटी 

२. रवा - अर्धी वाटी 

३. दही - पाव वाटी 

४. कांदा - १ 

५. शिमला मिरची - १ 

६. गाजर - १ 

७. मीठ - चवीनुसार 

८. तिखट - अर्धा चमचा 

९. चाट मसाला - अर्धा चमचा 

१०. तेल 

कृती -

१. राहिलेला भात, रवा आणि दही मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यायचे. आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आणि एकसारखे पीठ होईल असे करायचे.

२. कांदा, ढोबळी बारीक चिरुन आणि गाजर किसून या मिश्रणात घालायचे. 

३. यामध्ये मीठ, तिखट, चाट मसाला घालून मिश्रण एकजीव करुन घ्यायचे. 

४. आप्पे पात्रात तेल घालून त्यामध्ये पीठ घालून आप्पे दोन्ही बाजुने आप्पे खरपूस भाजून घ्यायचे. 

५. हे आप्पे सॉस, हिरवी चटणी, दही कशासोबतही अतिशय छान लागतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT