batata bhaji recipe sakal
फूड

Monsoon Special Recipes : संजीव कपूर यांनी शेअर केली बटाट्याच्या भजीची साधीसोपी रेसिपी

Monsoon Special Food : जीभेचे चोचले पुरवण्यासाठी आपणही प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी शेअर केलेली बटाटा भजीची साधीसोपी रेसिपी एकदा ट्राय करून पाहाच.

सकाळ डिजिटल टीम

Monsoon Special Recipes News : पावसाळा सुरू झालाय त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून सर्वसामान्यांची सुटका झाली आहे. पावसाळा या ऋतूची बातच काही और आहे. या ऋतूत प्रत्येकजण वेगवेगळे रूचकर पदार्थ तयार करून त्यांचा पोटभर आस्वाद घेतात. पावसाळ्यात भजी आणि चहा या टेस्टी डिशचे समीकरण तर ठरलेलंच आहे.

अलीकडेच शेफ संजीव कंपूर यांनीही बटाटा भजीची साधीसोपी रेसिपी आपल्या फॉलोअर्सकरिता शेअर केली.  फ्रेंच फ्राईज या पदार्थाची खवय्यांना तोंडओळख होण्यापूर्वी बटाटा व कांदा भजी हेच सर्वसामान्यांचे आवडीचे पदार्थ असायचे, अर्थात अजूनही आहेत.

पार्टीतील Menu Card मध्ये आता बरेच वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतात. पण कांदा व बटाट्याच्या भाजी (batata bhaji recipe in marathi) जागा कोणताही पदार्थ घेऊ शकत नाही. तुम्हालाही बटाट्याची भजी खायला आवडते का ?  चला तर जाणून घेऊया शेफ संजीव कपूर यांनी शेअर केलेली रेसिपी

रेसिपी तयार होण्याकरिता लागणारा कालवधी - 6-10 मिनिटे

कुकिंग टाईम - 11-15 मिनिटे

सामग्री

  • मध्यम आकाराचे बटाटे  - चार

  • चण्याचे पीठ – दीड कप

  • लाल तिखट मसाला – अर्धा चमचा

  • हळद – अर्धा चमचा

  • जिरे - 1/4 चमचा 

  • स्वादानुसार मीठ

  • भजी तळण्यासाठी तेल 

  • चाट मसाला

  • खजूर आणि कोथिंबिरीची चटणी

  • हिरवी चटणी

रेसिपी

  • स्टेप 1: एका बाऊलमध्ये चण्याचे पीठ घ्या. त्यामध्ये लाल तिखट मसाला, हळद, स्वादानुसार मीठ जिरे आणि आवश्यकतेनुसार पाणी एकत्रित करा. हे सर्व घटक योग्यरित्या एकजीव करा.

  • स्टेप 2 : एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा.  

  • स्टेप 3 : बटाट्याचे काप भजीच्या मिश्रणात डीप करा आणि मग भजी तळण्यासाठी तेलात सोडा.

  • स्टेप 4: भजी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घ्या. भजीचा रंग सोनेरी झाल्यानंतर कढईतून भजी काढावा. 

  • स्टेप 5 : एका प्लेटमध्ये चाट मसालासह बटाटा भजी सर्व्ह करावी.

हिरवी चटणी किंवा खजूर-कोथिंबिरीच्या चटणीसह बटाटा भजीचा आस्वाद घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: कोल्हापूर ब्रेकिंग : मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, तिघे जखमी

रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या...

Solapur Rain Update: मुंबईत मुसळधार! ‘वंदे भारत’ रद्द, ‘सिद्धेश्वर’ मुंबईऐवजी पुण्यातून; रेल्वेगाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT