Create a cake pop in lollipop style
Create a cake pop in lollipop style 
फूड

लॉलीपॉप शैलीमध्ये तयार करा केक पॉप

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आपण घरच्याघरी लॉलीपॉप शैलीमध्ये केक पॉप तयार करू शकतो. यासाठी आपल्याला फार कष्ट घ्यायची गरज भासणार नाही. चला तर जाणून घेऊया केक पॉप तयार करण्याची पद्धत.

या रेसिपीमध्ये आपण केक क्रम्स आणि फ्रॉस्टिंगचा वापर करू. याचे मिश्रण तयार करून घेऊ. याला लहान गोल बॉलचे आकार दिले जाते. केक पॉप्सद्वारे आपण आपल्या आवडत्या केकचा आनंद घेऊ शकतो. उर्वरित केक क्रम्सला आवडत्या केक फ्लेवर आणि साखरेद्वारा चविष्ट करता येईल.

लागणारी आवश्यक सामग्री

एक चॉकलेट स्पंज, अर्धा कप चॉकलेट, तीन छोटे चम्मच मलाई, दोन ग्राम फ्रोजन बिस्किट्स, चॉकलेट चिप्स व कलरफुल स्प्रिन्क्ल.

असे करा तयार

सर्वांत अगोदर चॉकलेट स्पंज केकला बारीक तुकड्यामध्ये परिवर्तित करा. यात आता क्रीम टाका. यावर बारीक केलेले बिस्कीट टाका. हे सर्व साहित्य चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. तुम्हाला हे मिश्रण कोरडे वाटले तर यावर अधिक मलई घालू शकता. आता याचे छोटे गोळे बनवा. यानंतर दोन ते तीन मिनिटासाठी ठेवून द्या. आता एक लॉलीपॉप स्टिक घ्या आणि चॉकलेट सोल्यूशनमध्ये बुडवा. यानंतर चॉकलेट पेस्टच्या वर लॉलीपॉप्स सारख्या केक पॉपचे तयार गोळे लावा.

आता तयार केलेले लॉलीपॉपला कमीतकमी एक तास सेट करण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. यानंतर रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढा आणि वितळलेल्या चॉकलेट सोल्यूशनमध्ये बुडवा. त्यावर स्प्रिंकल टाका. आता आपले खास केक पॉप सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत. आपल्या कुटुंबासह त्याचा आनंद घ्या. केवळ लॉलीपॉपच्या आकारातच नव्हे तर आपल्याला या केक पॉपला आपल्या आवडत्या इतर कोणत्याही आकारात आकार देऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT