Oats Bhurji Recipe  esakal
फूड

Oats Bhurji Recipe : सकाळी नाश्त्याला खा हेल्दी फुड; ओट्स आणि अंड्याची ही रेसिपी नक्की ट्राय करा

ओट्स हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर

सकाळ डिजिटल टीम

Oats Bhurji Recipe : ओट्स हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सध्याच्या हेल्दी फूड रेसिपीजमध्ये प्रमूख पदार्थ म्हणून ओट्सचे नाव घेतले जाते. वजन कमी करून रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते. सकाळच्या नाश्त्याला ओट्स खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहू शकता.

ओट्समध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असते. त्यामूळे त्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. आज आपण नाश्त्याला ओट्सची अंडा भूर्जी कशी बनवायची ते पाहूयात. कारण अंड आणि ओट्सचे शरीराला अनेक फायदे आहेत. तूम्ही अंडे खात नसाल तरी त्यासाठी दुसरा पर्याय आहे तो पाहूयात.

साहित्य

2 चमचे ओट्स, 2 अंडी कच्ची, 4 अंडी उकडून घेऊन त्याचा पांढरा भाग, तेल, 1 चिरलेला कांदा, मीठ, हिरवी मिरची आणि टोमॅटो.

कृती

एका मोठ्या भांड्यात आपण ऑमलेटसाठी तयार करतो तसे मिश्रण तयार करा, अंडी, ओट्स, भाज्या, हिरव्या मिरच्या आणि मीठ घालून एकजीव करा. एका मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात तयार केलेले मिश्रण घाला. थोडा वेळ शिजू द्या. गॅस बारीक करून १० मिनीटे शिजवा. वाढताना त्यावर कोथंबिर टाका आणि ब्रेड किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.

पनीर ओट्स भूर्जी

जर तूम्ही अंडे खात नसाल तर त्याजागी पनीरही वापरता येते. फक्त ते वापरण्याआधी पनीरचे छोटे तूकडे थोड्याशा तेलात फ्राय करून घ्या. तेलात भाज्या परतून त्यात थोडे पाणी घालून ओट्स शिजवा. ओट्स पूर्ण शिजल्यानंतर त्यात पनीर घालून मिश्रण कोरडे होईपर्यंत शिजवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Garbage Dump Accident : मेंदीचा रंग उतरण्याआधीच कुंकू पुसले; अक्षय सावंतच्या निधनाने पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अवघ्या दोन महिन्यांत संसाराची राखरांगोळी

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

Latest Marathi News Update : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ

Pune: रेंजहिल्स परिसरात ज्येष्ठ महिलेचा एकाकी अंत; परदेशात स्थायिक मुलाकडून पाचव्या दिवशी अंत्यसंस्कार

Telangana Crime: तेलंगणात आरोपीकडून सामूहिक हत्याकांड; पत्नी व दोन मुलांसह सहा जणांचा खून; हल्लेखोर राजकुमार फरार

SCROLL FOR NEXT