Palak Paneer Recipe  esakal
फूड

Palak Paneer Recipe : या पाच सोप्या स्टेप्सने बनवा हॉटेल स्टाइल पालक पनीर रेसिपी!

पनीरपासून बनणा-या सर्व डिशेपैकी पालक पनीर ही सर्वात लोकप्रिय रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

Palak Paneer Recipe : पनीरपासून बनणा-या सर्व डिशेपैकी पालक पनीर ही सर्वात लोकप्रिय रेसिपी आहे. शिवाय ही खूप पौष्टिक सुद्धा आहे. पालकामध्ये आयर्न आणि पनीरमध्ये प्रोटीनची भरपूर मात्रा असल्यामुळे ही डिश नक्कीच खूप यम्मी आणि हेल्दी आहे. तुम्ही ही डिश नान, पराठा आणि जीरा राईसोबत सर्व्ह करू शकतात. बघूया, टेस्टी व पौष्टिक पालक पनीरची रेसिपी!

साहित्य:

2 वाटी पालक

1 वाटी कांदा

1 चमचा फ्रेश क्रीम

1 वाटी टोमॅटो पेस्ट

1.2 चमचे जिरे

1 चमचा रेड चिली पावडर

1 चमचा तूप

1 चमचा लसूण

आवश्यकतेनुसार मीठ

आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या

250 ग्रॅम पनीर

आवश्यकतेनुसार पाणी

कृती:

Step 1:

पालकची जुडी स्वच्छ निवडून धुवून ५ ते ६ मिनिट उकळत्या पाण्यात शिजवून घ्या. आणि थंड व्हायला ठेवून द्या. उकळेल पाणी फेकून देऊ नका, यात खूप पौष्टिक घटक असतात, शिवाय ते तुम्ही भाजीच्या ग्रेव्हीत सुद्धा वापरू शकतात. आता त्यात २ हिरव्या मिरच्या घालून त्याची मिक्सरमध्ये पातळ पेस्ट करुन घ्या.

Step 2:

एका पॅनमध्ये साजूक तूप, अर्धा चमचा जीरे आणि बारीक चिरलेले लसूण घाला आणि लसूण जरा लालसर होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात कांद्याची पेस्ट घालून मिश्रण दोन मिनिटे चांगले परतून घ्या.

Step 3:

आता मिश्रणात टोमॅटोची पेस्ट घालून सर्व सामग्री मंद आचेवर 4 ते 5 मिनिट परतून घ्या. पुढे, त्यात मीठ, लाल तिखट घाला आणि 3 ते 4 मिनिट शिजवून घ्या.

Step 4:

मिश्रणात पालकची पेस्ट घालून सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करुन 3 ते 4 मिनिट शिजवा आणि त्यात थोडं पाणी देखील मिक्स करा

Step 5:

आता तयार झालेल्या पेस्टमध्ये ताज्या पनीरचे तुकडे घालून दोन मिनिटे शिजवून घ्या. हॉटेल स्टाईल पनीरची भाजी तयार आहे. पालक पनीर सर्व्ह करण्याआधी त्यामध्ये फ्रेश क्रिम घाला. नान, जीरा राईस किंवा चपातीसोबत तुम्ही हे सर्व्ह करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT