Patiala Peg
Patiala Peg 
फूड

Patiala Peg : शहराच्या नावाने का ठेवले मद्याचे नाव! काय आहे स्टोरी

सकाळ डिजिटल टीम

अनेकजण आजकाल मद्यपान करतात. कोणतीही गोष्ट प्रमाणात पिणे आरोग्यासाठी चांगले असते. मद्यपान करणाऱ्या लोकांना पेगविषयी फार आकर्षण असते. पण मद्यपान न करणाऱ्या लोकांनाही पटियाला पेग म्हणजे काय ते माहिती असते. यावर अनेक गाणीही तयार झाली आहेत. पण या पेगला पटियाला पेग का म्हणतात ते माहिती आहे का? चंदिगड, भटिंडा, जयपूर दिल्ली अशापैकी कोणतंतरी नाव या पेगला का दिलं नाही. पटियाला नाव देण्याशी संदर्भ हा इतिहासाशी आहे. तो कसा ते जाणून घेऊ.

मद्यपान करणारे लोक म्हणतात की पटियाला पेग प्रत्येकालाच झेपतो असं नाही. कारण पटियाला पेगमधील अल्कोहोलचे प्रमाण लार्ज पेगपेक्षा जास्त असते. मद्यपान करणाऱ्यांच्या मते पटियाला पेगमध्ये 120 ML मद्य असते. म्हणजे या पेगचा अर्धा ग्लास हा पाणी आणि अर्धा मद्याने भरलेला असतो. जर हा पेग कोणी नीट संपवला किंवा त्याला कोणताही त्रास झाला नाही तर ती व्यक्ती पक्की मद्यपी आहे, असं म्हटलं जातं.

महाराजा भूपिंदर सिंह

असा आहे संबंध

पटियाला पेगचा संबंध हा महाराजा भूपिंदर सिंह यांच्याशी आहे. ते 1900 ते 1938पर्यंत पटियालाचे राजा होते. या राजांनी आपल्या रॉल्स रॉईस गाडीने शहरातील कचरा उचलला होता. भूपिंदर सिंह यांची खास पोलो टीम होती. त्यात ८ शीख योद्धे होते. एकदा त्यांनी आयरिश (Irish) टीमला खेळायला बोलावले होते. हा खेळ खेळण्याआधी मद्यपान करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तेव्हा आयरीश टिमने आपली क्षमता दाखवण्यासाठी जास्त मद्यपान करायला सुरूवात केली. एकदा जास्त प्यायल्याने आयरीश टीम हरली. तेव्हा त्यांन सांगितले की पेग जरा जास्तच मोठे झाले होते. तेव्हा राजा म्हणाला की, पटियालात पेग अशाचप्रकारे मोठे तयार केले जातात. त्यानंतर या पेगची ख्याती वाढतच गेली आहे. असे असले तरी मर्यादेत मद्यपान करणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT