Raksha Bandhan Special Recipe esakal
फूड

Raksha Bandhan Special Recipe : रक्षा बंधनाला भावाचं तोंड गोड करण्यासाठी बनवा खास काजूचा हलवा, ही घ्या रेसिपी

या रक्षाबंधनाला रव्याचा शिरा किंवा मिठाई नाही तर काजूचा शिरा ट्राय करा

साक्षी राऊत

Raksha Bandhan Special Recipe : रक्षा बंधनासाठी तुम्ही नक्कीच विशेष तयारी करून ठेवली असेल. बहिणीने भावासाठी आणि भावाने बहिणीसाठी नेमके काय गिफ्ट घ्यावे याचे नियोजनही सुरू असेल. अशात तुम्ही रक्षाबंधनाला भावासाठी स्पेशल काजूचा शिरा बनवल्यास अगदी अगदी गोड पदार्थाप्रमाणेच त्याच्या चेहऱ्यावरसुद्धा गोड अशी स्माईल येईल. मग वाट कसली बघताय या रक्षाबंधनाला रव्याचा शिरा किंवा मिठाई नाही तर काजूचा शिरा ट्राय करा. चला तर टेस्टी क्रिमी काजूचा हलवा कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

काजूचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

२ कप काजू

२०० ग्राम साखर

केशर थोडी

१ चमचा वेलदोडा पावडर

२०० ग्राम तूप

२ कप किसलेले नारळ

अर्धा कप कोमट पाणी (Recipe)

काजूचा शिरा बनवण्याची रेसिपी

सगळ्यात आधी काजू चांगल्या प्रकारे भाजून घ्या.

नंतर त्याला ग्राइंडरमध्ये टाकून त्याचे बारीक पावडर बनवून घ्या.

आता थोड्याशा गरम पाण्यात केसर टाका आणि त्याचा रंग सुटू द्या.

तूप गरम झाल्यास कढईत काजू पावडर आणि किसलेले नारळ टाकून भाजून घ्या. ते सोनेरी होतपर्यंत भाजा.

आता गॅसची फ्लेम कमी करा. त्यात हळू हळू पाणी सोडा आणि वेगाने मिक्स करा. जेणेकरून गुठळ्या बनू नये. (Food)

आता चांगल्या प्रकारे पाण्यासह नारळाचा किस आणि काजू मिक्स केल्यानंतर त्यात साखर घाला. यावेळी गॅसची फ्लेम ही कमी असावी. यात आता केसरचे पाणी घाला. आणि ढवळा. आता त्यात वेलदोडे पावडर मिक्स करा आणि पाणी मुरेपर्यंत गॅस सुरू ठेवा. पाणी चांगल्या प्रकारे मुरल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तुम्ही यावर सुखा मेवासुद्धा टाकू शकता. किंवा रक्षाबंधनासाठी तुम्हाला ही डिश स्पेशल सजवायची झाल्यास यावर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या आणि सुखा मेवा टाकूनही सजवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT