Ramadan Special esakal
फूड

Ramadan Special : रमजान स्पेशल डीश, इफ्तारीसाठीची बनवा इंस्टंट एनर्जी देणारे अंडा पकोडे!

इफ्तारी बनवा स्पेशल, अंड्याचे पकोडे दिवसभराचा थकवा घालवतील

सकाळ डिजिटल टीम

इस्लाम धर्मात रमजान महिन्याला खूप महत्त्व आहे. रमजानच्या या पाक महिन्यात अल्लाहची प्रार्थना केल्याने त्याची दुवा लाभते. त्यामूळे या महिन्याती रोजांना अधिक महत्त्व आहे. त्यामूळेच इतरवेळी नमाज पठण न करणारे लोकही या महिन्यात न विसरता नमाज पढतात आणि उपवास करतात.  

रमजानच्या महिन्यात जवळपास सर्वच मुस्लिमांच्या घरी इफ्तारच्या वेळी स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ तयार केले जातात. हे खास पदार्थ खाऊनच रोजाचा उपवास सोडला जातो. अनेक ठिकाणी मोठ्या थाटामाटात इफ्तारी पार्टीचे आयोजही केले जाते.

तूम्हीही पक्के नमाजी असाल आणि रोजे करत असाल. तर तूमच्या आजच्या इफ्तारीची सोय आम्ही केली आहे. होय, आज आम्ही तूम्हाला एका खास पदार्थाबद्दल सांगणार आहोत. ज्या पदार्थामूळे तूमची दिवसभराची भूकही भागेल आणि तूम्हाला वेगळा पदार्थ टेस्ट करायला मिळेल.

साहीत्य

४ अंडी उकडून, २ कप बेसन, ४ चमचे रवा, १ चमचा लाल मिरची पावडर, १ टीस्पून चवीनुसार हळद, मीठ, १ चमचा ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पकोडे तळण्यासाठी तेल,

कृती

पकोडे बनवण्याची पद्धत यासाठी एका भांड्यात बेसन, रवा आणि सर्व मसाले घालून चांगले मिक्स करून घ्या. आता त्यात कोमट पाणी घालून पेस्ट तयार करा आणि १० मिनिटे ठेवा. दुसरीकडे एका भांड्यात अंडी उकडायला ठेवा.

अंडी उकडल्यानंतर त्याचे मधून दोन भाग करा. त्यानंतर त्यात मीठ आणि मिरची पूड घाला. आता तेल मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि गरम झाल्यावर गॅस बारीक करा.

बेसनाच्या मिश्रणात अर्धे केलेले अंड्याचे काप टाका. ते तेलात चांगले टाकून सोनेरी होईपर्यंत तळा. अंडी दोन्ही बाजूंनी तळून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या. आणि त्यासोबत हिरवी चटणी सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

West Indies Tour India 2025 : वेस्ट इंडिज संघ ७ वर्षांनी भारतात येणार; दिग्गज खेळाडूच्या मुलाला संधी, १५ सदस्यीय संघाची घोषणा

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT