फूड

हेल्दी रेसिपी : ढेस्याचे सूप

शिल्पा परांडेकर

आपल्याकडे भोगी, महालक्ष्मी (गौरी) जेवण, ऋषीपंचमी, पितृपक्ष अशा विविध सणांच्या प्रसंगी सोळा, पाच किंवा ऋतूतील उपलब्ध मिसळीच्या भाज्या करण्याची प्रथा आहे. त्यातीलच एक मानाची भाजी ‘ढेसे’ म्हणजे माठ. लाल व हिरवी अशा दोन प्रकारांत आढळणारी ही भाजी या सणांना करणे महत्त्वाचे मानले जात असून, ही भाजी उपवासालादेखील तितकीच आवडीने खाल्ली जाते.

माझ्या प्रवासात मी ही भाजी अनेकांच्या परड्यात उगवलेली पाहिली आहे. गावातील महिला त्यांच्या अनुभव व निरीक्षणातून या भाजीच्या रेसिपीसोबतच भाजीच्या उपयुक्ततेविषयी बरीच माहिती सांगतात. या भाजीमध्ये भाजीच्या देठांचा वापर केला जातो. शिवाय याची मुळेही अतिशय पौष्टिक असल्याने त्यांचाही भाजीमध्ये वापर होतो.

या भाजीत ‘ब’ जीवनसत्त्व, लोह, मॅग्नेशिअम, मॅगेनीज, फॉस्फरस आणि झिंक असे उपयुक्त घटक  आढळतात. ही भाजी पचनास सुलभ असून, वजन घटविण्याबरोबरच मूळव्याध, मासिक अतिस्त्राव, कोलेस्ट्रोल कमी करणे अशा समस्यांवरदेखील लाभदायक आहे. दुग्धवर्धक असल्यामुळे बाळंतिणीसाठी ही मुळे उपयुक्त आहेत. ज्वरनाशक असून इसबसारख्या त्वचारोगांवर बाह्यउपचार म्हणून ढेस्याच्या पानांचा लेप वापरला जातो.

इतर हेल्दी रेसिपीसाठी येथे क्लिक करा

या भाजीचा आहारात पारंपरिक किंवा आजच्या या ‘ट्वीस्ट’ रेसिपीने देखील समावेश करता येईल.

पारंपरिक भाजीमध्ये कांदा, डाळ, शेंगदाणा कूट, कारळाकूट घालून नेहमीच्या भाजीप्रमाणे भाजी बनवितात. ही देठे शिजण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे देठे आधी वाफवून घेणे आवश्यक असते.

ढेस्याचे सूप
साहित्य - ढेस्याची देठे, कांदा, लसूण, आल्याचा तुकडा (ऐच्छिक), कारळा चटणी.

कृती  - देठांची साल व शिरा काढून घेणे. (शेवग्याच्या शेंगांप्रमाणे)
कांदा, लसूण, देठे क्रमाक्रमाने तेलात परतून घेणे.
पाणी व आले घालून देठे शिजवून घेणे.
थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घेऊन गाळून घेणे.
मीठ घालून उकळून घेणे.
खातेवेळी वरून कारळा चटणी घालून सूप पिण्यास तयार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rule Change: एलपीजी, पॅन-आधार अन्...; १ जानेवारी २०२६ पासून 'हे' नियम बदलणार, सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

Latest Marathi News Live Update : भारत आणि श्रीलंका महिला संघात आज चौथा टी२० सामना

Chhatrapati Sambhajinagar News : दिल्लीतील पथसंचलनासाठी अक्षता मुळे हिची निवड; पाच वर्षांनंतर मिळाला मान

BMC Election: सत्तेचा काटा फिरवणार! काँग्रेस–वंचितची आघाडी कुणाचं गणित बिघडवणार? मुंबईची राजकीय सत्तासमीकरणं हादरली

Daulatabad News : वेरूळ, देवगिरी परिसर ‘हाउसफुल्ल’; घाटात वाहनांच्या रांगा; सलग सुट्यांचा परिणाम

SCROLL FOR NEXT