Aamir-khan work-for-soybean read its Benefits esakal
फूड

आमीर खाननं जाणलं सोयाबीनचं महत्व! ते खाल्ल्याचे ६ फायदे वाचा

आमीर खानच्या पाणी फाऊंडेशन संस्थेनं आता सोयाबीन वाढीसाठी काम करण्याचं ठरवलं आहे

सकाळ डिजिटल टीम

Benefits Of Soybean : सोयाबीन खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे लक्षात घेता आमीर खाननेही हाय प्रोटीनयुक्त सोयाबीनचं (Soybean) आहारात (Food) असलेलं महत्व जाणलं आहे. म्हणूनच की काय, अभिनेता अमीर खानच्या पाणी फाऊंडेशन संस्थेनं आता सोयाबीन वाढीसाठी काम करण्याचं ठरवलं आहे. शरीरासाठी सोयाबीन खूप महत्वाचे आहे. सोयाबीन मधुमेह, वजन कमी करणे आणि कॅंसरसारख्या आजारांपासून वाचविण्यासाठी फायदेशीर ठरते. सोयाबीनमध्ये प्रोटीनबरोबरच (Protein) , व्हिटामिन्स(Vitamin) तसेच इतर खनिज तत्व मिळतात. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रथिने हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सोयाबीनचा खाल्ल्याने शरीराला मुबलक प्रमाणात प्रथिनं मिळतात. सोयाबीन खाल्ल्यामुळे इतरही फायदे होतात.

सोयाबीन खाण्याचे फायदे | Benefits of Soybean

१) उच्च रक्तदाबाशी संबंधित काही आरोग्य समस्या असतील तर अशावेळी सोयाबीन खाणे चांगले असते. सोयाबीन रोज खाल्ल्याने उच्च रक्तदाब आटोक्यात ठेवता येतो.

२) सोयाबीन रोज खाल्ल्याने शरीर मजबूत होते. तसेच हृदयरोगाचा धोका कमी होतो. मानसिक रोगही सोयाबिन खाल्ल्याने दूर होतात.

३) सोयाबिन मानसिक संतुलन योग्य राखण्यासाठी मदत करतो. हृदयाच्या समस्या दूर करण्यासाठी सोयाबीन खाणे गरजेचे आहे. अशा रूग्णांसाठी डॉक्टरही सोयाबिन खाण्याचा सल्ला देतात.

Benefits Of Soybean

४) महिलांसाठी फायद्याचे - सोयाबीन महिलांसाठीही खूप चांगले आहे. आहारात सोयाबीनचा समावेश केल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडे कमकुवत होण्याचा धोका टाळता येतो. महिलांचे आरोग्य यामुळे चांगले होते.

५) पोटातील जंत मारण्यासाठीही सोयाबीनचा वापर होतो. सोयाबीनचे ताक प्यायल्याने पोटातील जंत नष्ट होण्यास मदत होते. मात्र असे करताना थोडेसे ताक पिऊन पाहा.

६) गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सोयाबीनचा वापर करावा. पण थोडेसे खाल्लाने त्रास झाल्यास सोयाबीन ९ महिन्यात खाऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT